शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अॅपलनं iPhone XS, XS Max आणि XR केले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 00:08 IST

अॅपलनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सॅन फ्रान्सिस्कोमधील कंपनीच्या मुख्यालयात आज रात्री एक इव्हेंट आयोजित केला आहे.

सॅन फ्रान्सिस्को- अॅपलनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सॅन फ्रान्सिस्कोमधील कंपनीच्या मुख्यालयात आज रात्री एक इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये अॅपलनं iPhone XS, XS Max आणि XR हे फोन लाँच केले आहेत. त्यातील दोन फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते या फोन्सचं अनावरण करण्यात आलं. अॅपलनं लाँच केलेल्या फोन्समध्ये अॅपल वॉचसह तीन विशेष फीचर्स दिले आहेत. लाँच करण्यात आलेल्या फोनमध्ये लो हार्ट रेट, हार्ट रिदम, ईसीजी अशी तीन प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहेत. या वेळी अॅपलनं तीन आयफोन, मॅकबुक एअर-2, अ‍ॅपल वॉच-4, एअरपॉड-2, फेस-आयडी आयपॅड लॉन्च केले आहेत. सीईओ टीम कुक म्हणाले, जगभरात आतापर्यंत 2 अब्ज आयओएस डिव्हाइस आहेत. या डिव्हाइसमुळे जगण्याचा अंदाजच बदलून गेला आहे. त्यांनी सर्वात आधी अॅपल वॉच- 4 सीरिज लाँच केलं आहे. ज्याची किंमत 399 डॉलरपासून सुरू होते. अॅपल वॉच-4ची विक्री 14 सप्टेंबरपासून 16 देशांमध्ये सुरू होणार आहे. परंतु या 16 देशांच्या यादीत भारताचं नाव नाही आहे.विशेष म्हणजे अॅपल वॉच 4 ची स्क्रीन आधीच्या वॉचच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढवली आहे. तसेच त्याची किंमत 399 डॉलर(28 हजार 700), 499 डॉलर (35 हजार 900) अशी असणार आहे. या वॉचमध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. तुम्ही एकदा वॉच पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्हाला जवळपास 18 तास ते चार्ज करावं लागणार नाही.अॅपलनं लाँच केलेल्या फोनमध्ये हटके फीचर्स आहेत. या फोन्सला अनुक्रमे 5.8 इंच आणि 6.5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत उपलब्ध करून दिला आहे. या नव्या आयफोनमधल्या कॅमे-याची क्लिअॅरिटीही जबरदस्त आहे. आयफोन XSमध्ये 6 कोअरचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा स्पीड इतर फोन्सच्या तुलनेत दुप्पटीनं वाढला आहे. तसेच आयफोन XS मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच