शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

बंपर डिस्काउंटसह विकत घेता येणार Apple iPhone 12; फ्लिपकार्ट सेलमधील किंमत आली समोर  

By सिद्धेश जाधव | Updated: September 28, 2021 11:46 IST

Flipkart Big Billion Days Sale Offers: फ्लिपकार्टने सेलमधील iPhone 12 च्या किंमतीचा खुलासा केला आहे. सध्या 65,900 रुपयांमध्ये मिळणार हा फोन सेलमध्ये 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

अ‍ॅपलने नुकतीच आपली iPhone 13 सीरिज भारतासह जगभरात सादर केली आहे. या लाँचनंतर कंपनीने आपल्या जुन्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात देखील केली आहे. परंतु फ्लिपकार्टच्या Big Billion Days सेलमध्ये जुने आयफोन मॉडेल्स अजून कमी किंमतीत उपलब्ध होतील असे दिसत आहे. फ्लिपकार्टने सेलमधील iPhone 12 च्या किंमतीचा खुलासा केला आहे. सध्या 65,900 रुपयांमध्ये मिळणार हा फोन सेलमध्ये 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन्ससह इतर अनेक प्रोडक्टसवर भरघोस डिस्काउंट मिळू शकतो. आता ई-कॉमर्स साईटने Apple iPhone 12 च्या सेलमधील किंमतीचा खुलासा केला आहे. फ्लिपकार्टच्या टीजरनूर Apple iPhone 12 जो सध्या 65,900 रुपयांमध्ये मिळत आहे, तो बिग बिलियन डेज सेलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ही किंमत फ्लिपकार्टच्या ‘Guess the Price’ सेगमेंटमधून समोर आली आहे.  

जर फ्लिपकार्ट सेलमध्ये iPhone 12 ची किंमत 49,999 ठेवण्यात आली तर iPhone 12 mini ची किंमत 40,000 रुपयांच्या आसपास असू शकते. अ‍ॅप्पलचे चाहते जुन्या आयफोन्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटची आतुरतेने वाट बघत आहेत. आयफोन्सच्या चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. विशेष म्हणजे अजून अ‍ॅमेझॉनने iPhone 12 सीरिजवरील डिस्काउंटची घोषणा केली नाही.  

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन