शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

असं करू नका! 21 वर्षानंतर Apple चं लोकप्रिय प्रोडक्ट बंद झाल्यावर युजर्स भावुक

By सिद्धेश जाधव | Updated: May 11, 2022 13:24 IST

Apple ने आपली iPod लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांची जागा होम पॉड मिनी, आयफोन आणि अ‍ॅप्पल वॉच घेतील.  

Apple नं अधिकृतपणे म्यूजिक प्लेयर iPod Touch बंद केला आहे, जो आयपॉड लाईनअपचा शेवटचा मॉडेल आहे. जो पर्यंत स्टॉक संपत नाही तोपर्यंत हा डिवाइस विकत घेता येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. आपल्या आवडत्या iPod ला निरोप देताना युजर्स भावुक झाले आहेत. सोशल मीडियावरून असं न करण्याची विनंती देखील अनेकांनी अ‍ॅप्पलला केली आहे.  

Apple iPod चा पहिला मॉडेल 2001 ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर आलेले अनेक मॉडेल्स कंपनीनं एक-एक करून बंद केले आहेत. ज्यात iPod Classic, iPod nano आणि iPod shuffle इत्यादींचा समावेश आहे. 2019 मध्ये आलेला 7th Gen iPod Touch या लाईनअपमधील शेवटचा आयपॉड ठरला आहे. ज्यात आयफोन 7 मधील A10 Fusion चिप आणि 4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला होता.  

आता मिळणार नाहीत iPod 

iPod ची विक्री बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. स्मार्टफोन्सवरच म्यूजिक, व्हिडीओ, गेमिंग आणि अन्य अनेक सुविधा मिळत आहेत. त्यामुळे वेगळा डिवाइस विकत घेण्याचा विचार देखील ग्राहक करत नाहीत. अ‍ॅप्पल आयपॉड बंद करणार हे निश्चित वाटत होतं परंतु इतका वेळ घेतला जाईल, हे अपेक्षित नव्हतं. कंपनीने iPod touch मध्ये अपडेट्स देणं काही वर्षांपूर्वीच बंद केलं होतं. विक्री देखील घटली होती.  

स्टॉक संपेपर्यंत iPod Touch बाजारात उपलब्ध होईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. म्यूजिक प्रेमींसाठी iPhones, Apple Watch आणि HomePod mini इत्यादी प्रोडक्ट्स अ‍ॅप्पलनं सुचवले आहेत.