शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात करा 'अनलॉक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 13:18 IST

फोन लॉक झाल्यास घाबरून जाण्याची काही गरज नाही. लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात कसा अनलॉक करायचा हे जाणून घेऊया. 

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोनची सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्त्वाची असते. त्यामुळेच युजर्स फोनमध्ये अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. तसेच फोनमध्येही पॅटर्न लॉक, पासवर्ड यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकदा काही जण आपला फोन ओपन करतात. त्यांनी तो ओपन करू नये यासाठी युजर्स पासवर्ड ठेवतात. मात्र काही वेळा तो पासवर्ड विसरल्यामुळे फोन लॉक होतो. फोन लॉक झाल्यास घाबरून जाण्याची काही गरज नाही. लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात कसा अनलॉक करायचा हे जाणून घेऊया. 

पहिली पद्धत 

- Android Phone चा वापर करत असाल तर फोन लॉक झाल्यानंतर अ‍ॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरची मदत घ्या. ही सर्व्हिस तुमच्या गुगल अकाऊंटसोबत कनेक्ट असते. 

- संगणकावरून जीमेल अकाऊंट लॉग इन करा. 

- अ‍ॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरमध्ये तुमचं डिव्हाईस सर्च करा. त्यावेळी ते अनलॉक केलं जातं. 

- यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. 

दुसरी पद्धत 

- फोनचा लॉक पॅटर्न विसरला असाल किंवा इतर कोणीतरी पॅटर्न बदलला असेल तर फॉरगेट पासवर्डच्या मदतीने पॅटर्न बदला.

- फॉरगेट पासवर्ड बदलण्यासाठी जीमेल अथवा गुगल अकाऊंटची माहिती द्या.

- यानंतर अकाऊंटवर एक ई-मेल येईल. त्यावर क्लिक केल्यास नवा पॅटर्न सेट करू शकता. 

तिसरी पद्धत 

- लॉक झालेला फोन अनलॉक करण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. मात्र हे करताना डेटा डिलीट होण्याची शक्यता ही अधिक असते. 

- फोनची स्विच ऑन होताच वॉल्यूम बटण, होम आणि पॉवर बटण एकत्र दाबा.

- असं केल्यास स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. त्यामध्ये फॅक्ट्री रीसेटचा देखील एक पर्याय मिळेल. 

- फॅक्ट्री रिसेट सिलेक्ट केल्यास फोन नव्या सिस्टमप्रमाणे काम करण्यासस सुरुवात करेल. 

जुन्या Android फोनमधून नव्या फोनमध्ये Contacts असे करा ट्रान्सफर

बापरे! टायपिंग ऐकून पासवर्ड हॅक करू शकतात हॅकर्स

टेक्नॉलॉजीच्या जगात हॅकींगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हॅकींगचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. केवळ टायपिंगचा आवाज ऐकून हॅकर्स पासवर्ड हॅक करू शकतात अशी नवी माहिती आता समोर आली आहे. साऊंडवेव्सच्या मदतीने या गोष्टी केल्या जातात. स्मार्टफोनच्या कीबोर्डवर युजर्स टाईप करतात तेव्हा त्यातून काही साऊंडवेव बाहेर येतात. टायपिंगच्या वेळी स्क्रीनवर येणाऱ्या प्रत्येक स्ट्रोकचं वेगळं व्हायब्रेशन असतं. मात्र हे व्हायब्रेशन कानाला ऐकू येत नाही. हॅकर्स साऊंडवेवच्या मदतीने पासवर्ड हॅक करतात. टायपिंगचं व्हायब्रेशन ते अ‍ॅप्सच्या मदतीने ऐकू शकतात. काही खास अ‍ॅप्स आणि अल्गोरिदमने स्मार्टफोनवरून तयार होणाऱ्या साऊंडवेव ऐकता आणि डीकोड करता येतात. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान