शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

अँड्रॉइड ओ : आगमनाची तयारी पूर्ण आता नावाची उत्सुकता !

By शेखर पाटील | Updated: August 14, 2017 11:13 IST

गुगलने आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमच्या ८.० म्हणजेच 'ओ' आवृत्तीला पुढील आठवड्यात लाँच करण्याचे संकेत दिले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

ठळक मुद्देगुगलची मालकी असणारी अँड्रॉइड ही जगातील सर्वाधीक लोकप्रिय मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमअँड्रॉइड ८.० म्हणजेच अँड्रॉइड ओ ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे.नावाच्या या स्पर्धेत ऑरेंज, ऑक्टोपस, ओटमील कुकीज आदी असल्याचेही मानले जात आहे.

गुगलने आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमच्या ८.० म्हणजेच 'ओ' आवृत्तीला पुढील आठवड्यात लाँच करण्याचे संकेत दिले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.गुगलची मालकी असणारी अँड्रॉइड ही जगातील सर्वाधीक लोकप्रिय मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असून याचे आजवर सात व्हर्जन्स युजर्सला सादर करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉइड ८.० म्हणजेच अँड्रॉइड ओ ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे. गुगलने अतिशय कल्पकतेने अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना मिष्ट पदार्थ अथवा डेझर्टस्चे नाव दिले आहेत. मे महिन्यात झालेल्या गुगलच्या आय/ओ कॉन्फरन्समध्ये अँड्रॉइड ८.० या आवृत्तीचे फिचर्स सादर करण्यात आले. यानंतर ही प्रणाली बीटा म्हणजेच प्रयोगात्मक स्थितीत वापरण्याची सुविधा देण्यात आली. याचे अनेक प्रिव्ह्यू सादर करण्यात आले. आणि आता ही प्रणाली अधिकृतपणे लाँच होणार आहे. विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी गुगल कंपनी आपली ही नवीन आवृत्ती सादर करू शकते. या दिवशी अमेरिकेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. हे या प्रकारचे एकविसाव्या शतकातील पहिलेच सूर्यग्रहण असून या अविस्मरणीय दिवसाचे औचित्य साधून अँड्रॉइड प्रणालीची ओ आवृत्ती सादर होईल असे मानले जात आहे. तर काही तज्ज्ञांनी यानंतरच्या काही दिवसांमध्ये याची अधिकृत घोषणा होईल असा दावा केला आहे. अर्थात अँड्रॉइड ओ अधिकृतपणे लाँच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.यापैकी किटकॅट, मार्शमॅलो, नोगट, आईस्क्रीम सँडविच आदी नावे आपल्या कानावरून गेली असतीलच. या पार्श्‍वभूमिवर अँड्रॉइड ओ आवृत्तीचे नेमके नाव काय असेल ? याची जगभरात प्रचंड उत्सुकता लागली आहे. मध्यंतरी गुगलने यासाठी जगभरातून युजर्सकडून सूचनादेखील मागविल्या होत्या. अर्थात अँड्रॉइड ८.० या प्रणालीचे नाव नियमानुसार ओ या आद्याक्षणावरून असल्याने यावरूनच सुरू होणार्‍या मिष्ट पदार्थांमधून याचे नाव निवडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांच्या मते ओरियो या क्रिमयुक्त कुकीजचे नाव याला दिले जाणार आहे. तर नावाच्या या स्पर्धेत ऑरेंज, ऑक्टोपस, ओटमील कुकीज आदी असल्याचेही मानले जात आहे. यात ऑरेंज म्हणजेच संत्री हे रूढ अर्थाने मिष्ट पदार्थ नाही. तथापि आयओएसची ओळख अ‍ॅपलशी जुळलेली असल्याने अँड्रॉइड ८.० ला ऑरेंजशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तर या आवृत्तीच्या डेव्हलपर प्रिव्ह्यूमध्ये ऑक्टोपसची आकृती दिसून आल्यामुळे याचे नाव ऑक्टोपस असण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. अर्थात अँड्रॉइड आणि गोडवा यांच्यातील संबंध आठव्या आवृत्तीपासून तुटण्याचे भाकीत यातून करण्यात आले आहे. तथापि, येत्या काही दिवसात याचे रहस्योद्घाटन होणार आहे.