शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

आता वायरलेस पद्धतीनं वापरता येणार अँड्रॉइड ऑटो !

By शेखर पाटील | Updated: January 2, 2018 12:39 IST

अलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे.

अलीकडच्या काळात बहुतांश कारमध्ये असणारी अँड्रॉइड ऑटो प्रणाली लवकरच वायरलेस पध्दतीत वापरणे शक्य होणार आहे. कारच्या विविध मॉडेल्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून इन्फोटेनमेंट प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यात संबंधीत प्रणालीला स्मार्टफोन कनेक्ट करता येते. याच्या माध्यमातून दिशादर्शनासह (नेव्हिगेशन) मनोरंजनाचा आनंद घेता येतो. मात्र अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमला परिपूर्ण प्रकारे कारमध्ये वापरायचे असल्यास याला अनेक मर्यादादेखील आहेत. या अनुषंगाने अँड्रॉइड ऑटो प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जगातील बहुतांश कार उत्पादकांनी याचा अंगिकार करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या दोन अनुक्रमे अँड्रॉइड व आयओएस प्रणालींवर आधारित सिस्टीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजवर अँड्रॉइड ऑटो प्रणाली वापरण्यासाठी युजरला आपला स्मार्टफोन मायक्रो-युएसबीच्या मदतीने संबंधीत उपकरणाला कनेक्ट करावा लागत आहे. सध्या अ‍ॅपल कार प्ले वायरलेस पध्दतीने वापरता येते असले तरी अँड्रॉइड ऑटोसाठी ही सुविधा नाही. वास्तविक पाहता गुगलने गेल्या वर्षी झालेल्या आपल्या आय/ओ परिषदेतच अँड्रॉइड ऑटो प्रणाली वायरलेस पध्दतीने सादर करण्यात येईल याचे सूतोवाच केले होते. नंतर मात्र याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. या पार्श्‍वभूमिवर, जेव्हीसी केनवुड या कंपनीने वायरलेस अँड्रॉइड ऑटो प्रणाली सादर करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या सीईएस-२०१८मध्ये याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मात्र या आधीच संबंधीत प्रणालीची माहिती समोर आली आहे. यानुसार कोणत्याही केबल कनेक्टीव्हिटीविना आता स्मार्टफोनवरील विविध फंक्शन्स यावर वायरलेस पध्दतीने वापरता येतील. ही कंपनी दोन उपकरणे सादर करणार असून यात एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल. विशेष म्हणजे यात अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले या दोन्ही प्रणालींचा सपोर्ट असेल. अर्थात या दोन्ही प्रणालींवर चालणारे स्मार्टफोन्स याला वायरलेस पध्दतीने कनेक्ट करून वापरता येतील.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान