शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Airtel, Vi आणि Jio च्या या प्लॅन्ससोबत मिळतंय Disney Plus Hotstar चं मोफत सब्सक्रिप्शन  

By सिद्धेश जाधव | Updated: September 18, 2021 17:09 IST

Disney Plus Hotstar Plans of Jio, Airtel and Vi: पुढे आम्ही सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अशा प्लॅन्सची यादी दिली आहे जे डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल प्लॅन मोफत देत आहेत.

Airtel, Vi आणि Jio ने काही रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत, ज्यात इतर बेनिफिट्ससह मोफत Disney Plus Hotstar Mobile चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या मोफत सब्सक्रिप्शनची किंमत 499 रुपये आणि वैधता एक वर्ष आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या या मोबाईल प्लॅनमध्ये 720p व्हिडीओ क्वॉलिटी, स्टीरियो ऑडियो क्वालिटी, आणि अ‍ॅपवरील सर्व कंटेंटचा लाभ मिळतो. जर तुम्ही उद्या पासून सुरु होणाऱ्या IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचा मोफत आनंद घेऊ इच्छित असाल तर पुढे आम्ही सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या अशा प्लॅन्सची यादी दिली आहे जे डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईल प्लॅन मोफत देत आहेत.  

Jio  

499 रुपयांचा जियो प्रीपेड पॅक: या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर यात 6GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि रोज 100 SMS मोफत.  

666 रुपयांचा प्रीपेड पॅक: या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील एका वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. 56 दिवसांच्या वैधतेसह येणारा या रिचार्जमध्ये 2 जीबी डेली डेटा मिळतो. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग, SMS आणि जियो अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. 

888 रुपयांचा प्रीपेड पॅक: या प्लॅनमध्ये 2GB डेटा डेली डेटा आणि 5GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. सोबत अनलिमिटेड कॉलिंग, 100 डेली SMS आणि जियो अ‍ॅप्सचे बेनिफिट्स मिळतील 84 दिवसांसाठी देण्यात येतील. 

2,599 रुपयांचा प्रीपेड पॅक: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. यात रोज 2GB डेटा आणि अतिरिक्त 10GB डेटा दिला जात आहे. इतर बेनिफिट्स वरील प्लॅन्स सारखे आहेत.  

549 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन रिचार्ज प्लॅन: हा एक डेटा अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळेल आणि याची वैधता 56 दिवस आहे. डेटा अ‍ॅड-ऑन सोबतच या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळेल. 

Airtel  

499 रुपयांचा पॅक: 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या एयरटेलच्या प्लॅनमध्ये डिज्नी + हॉटस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सदस्यत्व मोफत मिळत आहे. हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, 3GB डेली डेटा आणि 100 एसएमएससह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्लॅनसह 30 दिवसांचे प्राइम व्हिडीओ मोबाईल व्हर्जन, विंक म्यूजिक आणि एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे बेनिफिट देखील मोफत मिळतात. तसेच मध्ये 3 महिन्यांसाठी अपोलो 24|7 सर्कल, 1-वर्षासाठी शॉ अकादमी अ‍ॅक्सेस आणि FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देखील फ्री देण्यात आला आहे.  

699 रुपयांचा पॅक: या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह युजर्सना रोज 2GB डेटा आणि 100 SMS दिले जात आहेत. तसेच या रिचार्जमध्ये प्राइम व्हिडीओ मोबाईल व्हर्जनची फ्री टेस्टिंग आणि एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियमचे बेनिफिट देखील मिळतात.  

2,798 रुपयांचा पॅक: हा प्लॅन एक वर्षाच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. यात रोज 2GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळते.  

Vi (Vodafone idea)  

501 रुपयांचा पॅक: या प्लॅनमध्ये डिज्नी+ हॉटस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 3जीबी डेली डेटा आणि 100 फ्री एसएमएस दिले जात आहेत. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रात्री अनलिमिटेड डेटा वापरता येतो. तसेच या रिचार्जमध्ये वीकेंड रोलओवर डेटाचा फायदा देखील मिळतो.  

601 डेटा अ‍ॅड-ऑन पॅक: हा एक डेटा अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे. 56 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये 3GB डेली डेटा आणि डिज्नी+ हॉटस्टार मोबाईलचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

2,595 रुपयांचा पॅक: 1.5GB डेली डेटा देणाऱ्या या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. यात डिज्नी+ हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शनसह Vi movies and TV, Weekend data rollover आणि Binge All Night असे बेनिफिट देखील मिळतात.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया