शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! एक वर्षापर्यंत सिम राहील अ‍ॅक्टिव्ह, Unlimited Free Calling आणि हाय-स्पीड इंटरनेट मिळेल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:09 IST

Airtel : एअरटेलच्या ज्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही सांगत आहोत त्याची किंमत 1799 रुपये आहे.

नवी दिल्ली : जर तुम्हालाही दर महिन्याला रिचार्जची तारीख आठवत नसेल आणि प्लॅन संपल्यानंतरच दर महिन्याला रिचार्ज करत असाल तर तुमची कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा बंद पडणे साहजिकच आहे आणि अनेकवेळा तुम्ही अडचणीतही येऊ शकतात. तुमच्यासोबत असे घडू नये हे लक्षात घेऊन एअरटेलने (Airtel) यूजर्ससाठी एक खास प्लॅन आणला आहे, एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन नाही. विशेष बाब म्हणजे हा एक प्रीपेड प्लॅन आहे, त्यामुळे यूजर्सना सर्वोत्तम फायदे मिळतील आणि पोस्टपेडचा त्रास होणार नाही. जर तुम्हाला या प्लॅनबद्दल कोणतीही माहिती नसेल तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

एअरटेलच्या ज्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही सांगत आहोत त्याची किंमत 1799 रुपये आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 1 जानेवारीला तुमचा प्लॅन रिचार्ज केला तर हा प्लॅन पुढील वर्षी 1 जानेवारीला संपेल आणि तोपर्यंत तुम्ही अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग तसेच इंटरनेट सेवांचा आनंद घेऊ शकाल. 

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. जी तुम्हाला वर्षभर ऑफर केली जाईल, इतकेच नाही तर तुम्हाला यामध्ये 24 जीबी डेटाही मिळेल, ज्यामुळे तुमचे इंटरनेटशी संबंधित काम सहज होईल. यासोबत तुम्हाला 3600  एसएमएस वर्षभर मिळतील. इतकंच नाही तर तुम्हाला Apollo 247 सर्कलचे सबस्क्रिप्शन देखील मिळते, जे 3 महिन्यांसाठी लागू आहे आणि तुम्हाला FastTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जातो. याचबरोबर,  तुम्हाला फ्री Hello Tunes आणि Free Wynk Music चे सब्सक्रिप्शन देखील मिळते. त्यामुळे एकूणच जर तुम्हाला जास्त इंटरनेटची गरज नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञान