शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Airtel ग्राहक संकटात; आधार कार्डसह डेटा लीक, हॅकरकडून विकण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:17 IST

Airtel Data leak : जर या हॅकरनी ही डेटा कोणाला विकला तर एअरटेल ग्राहकांसाठी हे धोक्याचे आहे. कारण मोबाईल नंबर आणि आधार नंबरवर बँकेची अनेक कामे होत असतात. पैशांची देवाणघेवाणही होत असते.

Airtel ग्राहकांसाठी धोक्याची घंटा आहे. एअरटेलच्या वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये ग्राहकांचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, लिंग आदींची माहिती फुटली आहे. हॅकरनी 25 लाख ग्राहकांचा डेटा चोरला आहे. त्यांच्याकडे भारतातील सर्व एअरटेल ग्राहकांचा डेटा असून तो त्यांना विकायचा आहे. 

जर या हॅकरनी ही डेटा कोणाला विकला तर एअरटेल ग्राहकांसाठी हे धोक्याचे आहे. कारण मोबाईल नंबर आणि आधार नंबरवर बँकेची अनेक कामे होत असतात. पैशांची देवाणघेवाणही होत असते. डेटा लीक झाल्याचे वृत्त IANS ने दिले आहे. एअरटेलदेखील या हॅकरसोबत चर्चा करत आहे. एअरटेलनेही डेटा चोरी झालाय का हे तपासले आहे. तसेच हॅकरनी एअरटेलकडेही 3500 डॉलर्सचे बिटकॉईन मागितले आहेत. एअरटेलने हा डेटा तपासला असता तो खरा निघाला आहे. इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी याची माहिती दिली आहे. हॅकर कंपनीला ब्लॅकमेल करत आहेत. जर मागणी पूर्ण केली नाही तर ते हा डेटा डार्क वेबवर विक्रीला काढणार आहेत. यासाठी त्यांनी एक वेबसाईटही तयार केली असून त्यावर डेटाचे एक सॅम्पल दिले होते. हा डेटा जम्मू आणि काश्मीरच्या एका भागातील आहे. रेड रॅबिट टीम नावाच्या हॅकरने हा डेटा चोरी केला असून सर्व भारतीय एअरटेल ग्राहकांचा डेटा त्याच्याकडे असल्याचा दावा केला आहे. 

हॅकरने दिलेली लिंक बंद करण्यात आल्यावने दुसऱ्य़ा लिंकवर पुन्हा डेटा शेअर करण्यात आला आहे. ही माहिती एअरटेलच्या सर्व्हरमधून लीक झाल्याची शक्यता नसून अन्य कोणत्यातरी माध्यमातून हा डेटा लीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्य़े सुरक्षेसाठी ज्या सरकारी संस्था हा डेटा अॅक्सेस करतात त्यांचा वापर केला गेला असण्याची शक्यता राजहारिया यांनी वर्तविली आहे. 

महत्वाचे म्हणजे हॅकरने जो डेटा लीक केला आहे त्यातील मोठा भाग हा एअरटेलचा नाहीय. यामुळे कंपनीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असून आपल्याकडून कोणतीही माहिती हस्तांतरण झाली नसल्याचे एअरटेलने म्हटले आहे. तसेच ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Airtelएअरटेल