शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

मुंबईनंतर महाराष्ट्रातील आणखी एका शहरात एअरटेलची 5G सेवा लाँच; पुणे की आणखी कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 20:16 IST

Airtel 5G Plus Service : युजर्सना आता पूर्वीपेक्षा 20-30 पट अधिक वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यामध्ये उत्कृष्ट साउंड एक्सपीरिएंस तसेच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटीचा समावेश असेल, असे कंपनीने सांगितले.

नवी दिल्ली : भारती एअरटेलने (Airtel) आज (6 ऑक्टोबर 2022) आठ शहरांमध्ये 5G प्लस (Airtel 5G Plus) सेवा सुरू केली आहे. युजर्सना आता पूर्वीपेक्षा 20-30 पट अधिक वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यामध्ये उत्कृष्ट साउंड एक्सपीरिएंस तसेच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटीचा समावेश असेल, असे कंपनीने सांगितले.

टेलिकॉम कंपनीने पुढे सांगितले की, ही सेवा वापरण्यासाठी युजर्सना त्यांचे सिम कार्ड बदलावे लागणार नाही. त्यांना सर्व 5G सेवा फक्त सध्याच्या एअरटेल सिमवर मिळतील. अशात ज्या युजर्सकडे 5G फोन आहे, ते त्यांच्या सध्याच्या डेटा प्लॅनवर हाय-स्पीड एअरटेल 5G प्लसचा लाभ घेऊ शकतात, जोपर्यंत ते अधिक मोठ्या प्रमाणावर आणले जात नाही.

'या' 8 शहरांमध्ये 5G सेवा झाली सुरू - दिल्ली- मुंबई- चेन्नई- बंगलोर- हैदराबाद- सिलीगुडी- नागपूर- वाराणसी

या 8 शहरांमध्ये राहणारे युजर्स एअरटेल 5G प्लस सेवेचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, वेळेसोबत त्याचे नेटवर्क वाढत जाईल, असे कंपनीने सांगितले. 

कंपनीचे सीईओ काय म्हणाले?भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विट्टल म्हणाले की, "आमचे एअरटेल 5G प्लस नेटवर्क सध्याच्या एअरटेल सिम असलेल्या कोणत्याही 5G हँडसेटवर काम करेल. युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्याची आमची उत्साह आता 5G सोबत आहे, जे पर्यावरणपूरक देखील आहे." याचबरोबर, एअरटेल 5G प्लस येत्या काळात कम्युनिकेट करण्यासाठी, कामासाठी आणि खेळासाठी टेक्नॉलॉजी पूर्णपणे बदलणार आहे. एअरटेल 5G प्लस हे अशा टेक्नॉलॉजीवर चालते, जी जगातील सर्वात प्रगत इकोसिस्टमसह स्वीकारले गेले आहे. भारतातील सर्व 5G स्मार्टफोन एअरटेल नेटवर्कवर अखंडपणे काम करतात याची आम्ही खात्री करू, असे गोपाल विट्टल यांनी सांगितले.

5G नेटवर्क अशी क्रांती आणेलएअरटेल 5G प्लस गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, फोटोंचे लगेच अपलोडिंग इत्यादींसाठी सुपरफास्ट ऍक्सेसची अनुमती देईल. भारती एअरटेलने गेल्या आठवड्यात देशात 5G चे अधिकृत लाँच केले. या लाँचमध्ये, एअरटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर स्मार्ट फार्मिंग सोल्यूशन्स तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक आरोग्य सेवा बदलण्यासाठी 5G कनेक्टेड रुग्णवाहिकेचे प्रदर्शन केले होते.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञान5G५जी