शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Airtel 5G Plans Leaked: एअरटेल 5G चे प्लॅन्स लीक? 249 रुपयांपासून सुरु होणार रिचार्ज, Jio टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 14:49 IST

Airtel 5G Plans Leak: रिलायन्स जिओने इन्व्हायटेड लोकांनाच ५जीची ट्रायल देण्यास सुरुवात केली आहे. तर एअरटेलच्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर ५जी चे सिग्नल दिसू लागले आहेत.

देशात आता ५जीचे पर्व सुरु झाले आहे. एअरटेलने आठ शहरांत तर रिलायन्स जिओने चार शहरांत ५जी सेवा सुरु केली आहे. आता ग्राहक 5G रिचार्ज प्लान्सच्या घोषणेची वाट पाहत आहेत. अशातच एअरटेल ५जी चे संभाव्य प्लान्स लीक झाले आहेत. एअरटेल काही दिवसांतच प्लान्सदेखील जाहीर करण्याची शक्यता आहे. 

रिलायन्स जिओने इन्व्हायटेड लोकांनाच ५जीची ट्रायल देण्यास सुरुवात केली आहे. तर एअरटेलच्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर ५जी चे सिग्नल दिसू लागले आहेत. म्हणजेच रेंज मिळू लागली आहे. परंतू, अद्याप त्यांना ५जीच्या स्पीडने डेटा सुरु झालेला नाही. हा डेटा ५जी प्लानचे रिचार्ज मारले की चालू होणार आहे. 

एअरटेलने ५जीमध्ये आघाडी घेतली असली तरी जिओ आणि एअरटेलमध्ये प्राईस वॉर रंगण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार एअरटेल चार प्रकारचे ५जी प्लॅन आणू शकते. यामध्ये २४ दिवस, ५६ दिवस, ८४ दिवस आणि ३६५ दिवसांची वैधता असणार आहे. हे प्लॅन डेटानुसार विभागले जाणार आहेत. 

एअरटेलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांना येण्याची शक्यता आहे. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये २४ दिवसांची वैधता दिली जाईल. 56 दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा दुसरा स्वस्त प्लॅन 499 रुपयांमध्ये येईल. यात सहा जीबी डेटा दिला जाईल. 365 दिवसांच्या वैधतेचा प्लान 1699 रुपयांना असेल यात एकूण 24 जीबी डेटा देण्यात येईल. हे सर्व स्वस्त प्लॅन आहेत. 

डेली डेटा ऑफरचे प्लॅन

  • एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन 2399 रुपयांचा असेल. 365 दिवसांची वैधता व दररोज १.५ जीबी डेटा मिळेल.
  • 56 दिवसांच्या वैधतेचा प्लान 699 रुपयांना असेल. यात दररोज १.५ जीबी डेटा दिला जाईल. 56 दिवसांचा आणखी एक प्लॅन 799 रुपयांना असेल. यात 2.5 GB डेटा दिला जाण्याची शक्यता आहे. 
  • एअरटेल ८४ दिवसांमध्ये देखील प्लॅन आणणार आहे. एक प्लॅन 849 रुपयांना दररोज 1.5 GB डेटा दिला जाईल. दुसरा प्लॅन 949 रुपयांचा असेल व दररोज २.५ जीबी डेटा दिला जाईल. 
टॅग्स :5G५जीAirtelएअरटेल