शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

By अनिल भापकर | Updated: January 16, 2018 20:04 IST

सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

ठळक मुद्देसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही .यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .

मोबाईल मधील कॅमेरा जेव्हापासून पावरफुल झाला तेव्हापासून अनेकांमधील फोटोग्राफीचा सुप्त गुण जागा झाला. वाढदिवस असो कि बाहेर फिरायला जाणे असो ग्रुप फोटो काढून ते लगेच सोशल मीडिया वर अपलोड करण्याचा ट्रेंड हल्ली टेक्नोसॅव्ही पिढीमध्ये दिसून येतो. यामुळेच सेल्फीची लोकप्रियता वाढली आहे. सेल्फी काढणे चांगले कि वाईट यावर अनेक खलबते झाली आहे. कारण सेल्फीचे जेवढे फायदे तेवढेच सेल्फी मुळे अपघात होण्याचे प्रमाणही भरपूर उघडकीस आले आहे.मात्र सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

काय आहे नेमकं एअर सेल्फी ?हा एक स्मार्टफोन साईज चा आणि वजनाने हलका असा ड्रोन कॅमेरा आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५० ते ६५ ग्रॅम आहे . हा ड्रोन कॅमेरा  ऍप च्या माध्यमातून स्मार्टफोन वरून कन्ट्रोल केल्या जातो . या ड्रोनला ५ एमपीचा एच डी कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्रोन कॅमेरा स्वतः च्या वायफाय ने स्मार्टफोन ला कनेक्ट करता येतो . यामध्ये उच्च प्रतीचे विविध सेन्सर वापरले असून त्यांच्या मदतीने उच्च प्रतीचे फोटो काढता येतात .या ड्रोन मध्ये चार मायक्रो मोटर्स असून हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे . या ड्रोन मध्ये वापरलेली बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. या ड्रोन मध्ये ४ जीबीचे स्टोरेजही आहे.

तर मग मस्त आहे ना सेल्फी ची लोकप्रियता आणखी वाढविणारे हे एअर सेल्फी तंत्रज्ञान .

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल