भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी AI Plus ने आपली बहुप्रतिक्षित Nova Series अधिकृतपणे लाँच केली आहे. या सिरीजमध्ये 'Nova 2', 'Nova 2 Ultra' आणि कंपनीचा पहिला बजेट फोल्डेबल फोन 'Nova Flip' यांचा समावेश आहे. हे सर्व फोन्स कंपनीच्या नवीन NXT Quantum OS वर चालतात, जो विशेषतः AI फीचर्ससाठी डिझाइन केला आहे.
Nova 2 Ultra: बजेटमध्ये फ्लॅगशिप अनुभवह्या फोनमध्ये ६.७८ इंचाचा १.५ के अॅमोलेड डिस्प्ले दिला असून तो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ६००० mAh ची मोठी बॅटरी आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (Sony IMX752 सेन्सर) आहे. गेमिंगसाठी यात खास ट्रिगर्स आणि 'NxtHalo' लायटिंग इफेक्ट्स देण्यात आले आहेत.
Nova Flip: सर्वांत स्वस्त फोल्डेबल फोन?AI Plus ने आपला पहिला फ्लिप फोन लाँच करून सॅमसंग आणि मोटोरोला टक्कर दिली आहे. केवळ ₹२९,९९९ च्या किमतीत लाँच झालेला हा फोन सध्याचा सर्वांत परवडणारा फोल्डेबल फोन ठरू शकतो. यात ३.१ इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले दिला आहे.
डिस्प्ले: ६.९ इंचाचा मुख्य AMOLED डिस्प्ले आणि ३.१ इंचाचा कव्हर डिस्प्ले.
प्रोसेसर: Dimensity ७४०० चिपसेट.
कॅमेरा: ५० MP + १२ MP ड्यूअल रिअर कॅमेरा.
| मॉडेल | प्रमुख फिचर्स | किंमत (अंदाजे सुरुवातीची) |
| Nova 2 5G | Unisoc T8200, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा | ₹८,९९९ |
| Nova 2 Ultra | Dimensity 7400, 1.5K AMOLED, 144Hz | ₹१४,९९९ |
| Nova Flip 5G | 6.9" Inner AMOLED, 3.1" Cover Display | ₹२९,९९९ |
NXT Quantum OS चा करिष्मा:हे सर्व फोन्स अँड्रॉइड १६ वर आधारित 'NxtQ OS' वर चालतात. यात प्रगत AI शॉर्टकट, गेमिंग कस्टमायझेशन आणि बॅटरी ऑप्टिमायझेशनसाठी खास अल्गोरिदम वापरले आहेत.
Web Summary : AI Plus launched its Nova series, including the Nova Flip foldable phone at ₹29,999. The series runs on NXT Quantum OS with AI features and offers budget-friendly flagship experiences.
Web Summary : एआई प्लस ने नोवा सीरीज़ लॉन्च की, जिसमें ₹29,999 में नोवा फ्लिप फोल्डेबल फोन शामिल है। यह सीरीज़ एआई फीचर्स के साथ NXT क्वांटम ओएस पर चलती है और बजट-अनुकूल फ्लैगशिप अनुभव प्रदान करती है।