गेल्या काही काळापासून जगभरात 'एआय'चा वापर ज्या वेगाने वाढतोय, त्याचे प्रतिबिंब आता मोबाईल ॲप्सच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 'सेन्सर टॉवर'च्या ताज्या जागतिक अहवालानुसार, २०२५ मध्ये चॅटजीपीटी हे जगातील दुसरे सर्वात जास्त डाउनलोड झालेले ॲप ठरले आहे. सध्या केवळ 'टिकटॉक' हे चॅटजीपीटीच्या पुढे असून, एआय असिस्टंट्सच्या श्रेणीत चॅटजीपीटीने एकहाती वर्चस्व गाजवले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
डाउनलोडिंगमध्ये १४८ टक्क्यांची प्रचंड वाढ
सेन्सर टॉवरच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये चॅटजीपीटीच्या डाउनलोड्समध्ये १४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. केवळ डाउनलोडच नाही, तर या ॲपच्या प्रीमियम फीचर्ससाठी पैसे मोजणाऱ्यांच्या संख्येतही २५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, वापरकर्ते या ॲपवर पूर्वीपेक्षा ४२६ टक्के जास्त वेळ घालवत आहेत. या शर्यतीत गुगल जेमिनी, डीपसीक, मेटा एआय आणि मायक्रोसॉफ्ट को-पायलट यांसारख्या ॲप्सचाही समावेश आहे, परंतु चॅटजीपीटीने सर्वांना मागे टाकले आहे.
सोशल मीडियाचा दबदबा कायम, पण गेमिंग पिछाडीवर
एआय ॲप्सच्या या वादळात गेमिंग ॲप्स काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे महत्त्व अजूनही टिकून आहे. गेल्या वर्षभरात जगभरातील युजर्सनी सोशल मीडिया ॲप्सवर तब्बल २.५ ट्रिलियन तास खर्च केले आहेत. सरासरी प्रत्येक युजर दररोज ९० मिनिटे सोशल मीडियावर असतो. या संपूर्ण यादीत 'टिकटॉक' अजूनही पहिल्या क्रमांकावर अढळ आहे.
ॲप डाउनलोड करण्यात भारतीय जगात 'नंबर १'
एआय ॲप्स आणि चॅटबॉट्स डाउनलोड करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात डाउनलोड होणाऱ्या एकूण एआय ॲप्सपैकी २० टक्के डाउनलोड्स एकट्या भारतातून होतात. मात्र, एक विरोधाभास असा की, भारतीय युजर्स ॲप डाउनलोड करण्यात आघाडीवर असले तरी, प्रीमियम फीचर्ससाठी पैसे खर्च करण्याच्या बाबतीत मागे आहेत. २०२५ मध्ये जागतिक स्तरावर ॲपवर खर्च करणाऱ्यांपैकी भारतीय युजर्सचे प्रमाण केवळ १ टक्का इतकेच होते.
Web Summary : ChatGPT's downloads surged 148% in 2025, becoming second only to TikTok globally. Indian users lead in AI app downloads, comprising 20% worldwide, but lag in premium feature spending, accounting for only 1% globally.
Web Summary : चैटजीपीटी के डाउनलोड में 2025 में 148% की वृद्धि हुई, जो विश्व स्तर पर टिकटॉक के बाद दूसरे स्थान पर है। भारतीय उपयोगकर्ता एआई ऐप डाउनलोड में 20% के साथ विश्व में सबसे आगे हैं, लेकिन प्रीमियम सुविधाओं पर खर्च करने में पीछे हैं।