शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

रेडमी-रियलमीची जागा घेण्याची तयारी? बजेट Motorola चा नवा फाडू 5G Smartphone लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: June 9, 2022 12:02 IST

Motorola नं आपला नवा 5G स्मार्टफोन Moto G62 5G 50MP कॅमेरा आणि 5,000Ah च्या बॅटरीसह लाँच केला आहे.  

Motorola सध्या थांबायचं नाव घेत नाही, कंपनीनं लागोपाठ डिवाइस लाँच करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. भारतात स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G82 लाँच केल्यानंतर आता कंपनीनं ब्राजीलमध्ये किफायतशीर Moto G62 5G स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्यात स्नॅपड्रॅगन 4-सीरीज चिप, 120Hz डिस्प्ले, 50-मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 5,000Ah ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Moto G62 5G ची किंमत  

Motorola नं अजूनतरी Moto G62 5G च्या किंमतीची माहिती दिली नाही. तसेच हा हँडसेट कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल ही माहिती डॆहील गुलदस्त्यात आहे. फीचर्स आणि स्पेक्स पाहता याची किंमत मिडरेंजमध्ये असू शकते. हा ग्रॅफाइट आणि ग्रीन या दोन रंगात विकत घेता येईल.  

Moto G62 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G62 5G मध्ये 6.5-इंचाचा IPS पॅनल देण्यात आला आहे, जो FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेमधील पंच-होल मध्ये 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. जो 118-डिग्री FOV असेलल्या 8MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेऱ्यासह येतो.  

Moto G62 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो. फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित MyuX वर चालतो.  साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 20W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान