शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

32GB रॅमसह आला Acer चा जबराट लॅपटॉप; विंडोज 11 सपोर्टसह मिळणार 144Hz रिफ्रेश रेट  

By सिद्धेश जाधव | Published: March 31, 2022 6:07 PM

Acer Nitro 5 (2022) गेमिंग लॅपटॉप भारतात 12th-generation Intel Core प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.  

Acer Nitro 5 2022 गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. या कंपनीनं 12th-generation Intel प्रोसेसर, Windows 11 Home सपोर्ट, 15.6 इंचाचा full-HD डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट, असे दमदार स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. चला जाणून घेऊया या लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.  

Acer Nitro 5 2022 Gaming Laptop चे स्पेसिफिकेशन्स  

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा मोठा डिस्प्ले फुलएचडी रिजोल्यूशनसह देण्यात आला आहेव. जो 1,920×1,080 पिक्सल रेजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 16:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. दमदार ऑडियोसाठी कंपनीनं 2W चे ड्युअल स्पिकर्स दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी एचडीएमआय 2.1, 4 थंडरबोल्ट, इंटेल किलर ईथरनेट E2600, इंटेल किलर Wi-Fi 6 AX1650i आणि ब्लूटूथ V5.1 असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या गेमिंग लॅपटॉपमध्ये 720p HD वेबकॅम आहे. सोबत ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज रिडक्शन फीचर मिळतं. 

कंपनीनं 12th-generation Intel Core i5-12500H आणि Intel Core i7-12700H प्रोसेसरचा वापर करून दोन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. यात Nvidia GeForce RTX 3050 ग्राफिक्स देखील देण्यात आलं आहे. लॅपटॉपमध्ये 16GB DDR4 RAM देण्यात आला आहे, जो 32GB पर्यंत वाढवता येतो. सोबत 512GB M.2 PCIe SSD स्टोरेज मिळते, जी 1TB पर्यंत वाढवता येते. या एसरच्या लॅपटॉप मध्ये Four-cell 57.5Whr बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.  

किंमत  

Acer Nitro 5 2022 गेमिंग लॅपटॉपच्या Intel Core i5-12500H व्हेरिएंटची किंमत 84,999 रुपये आहे. तर Core i7-12700H व्हेरिएंटसाठी 1,09,999 रुपये मोजावे लागतील. हा लॅपटॉप अ‍ॅमेझॉनसह कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून विकत घेता यईल.  

टॅग्स :acerएसरlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान