शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar Alert : सावध व्हा! बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे होतोय आधार स्कॅम, सरकारकडून रेड अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 10:56 IST

आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा दुरुपयोग किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे होऊ शकते.

नवी दिल्ली : आधार कार्डाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता यावर अंकुश ठेवण्यासाठी, तसेच आधारचा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा दुरुपयोग किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे होऊ शकते. त्यामुळे भारत सरकारने आधार युजर्ससाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

दरम्यान, UIDAI ने ट्विटरवर युजर्सना सध्या होत असलेल्या स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याचा ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आल्यास सावध राहा आणि अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका. या बनावट मेसेजद्वारे स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज किंवा ईमेलवर कागदपत्रे शेअर करण्यास सांगत आहेत, त्यामुळे अशा मेसेजला उत्तर देणे टाळा. तसेच, तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असल्यास तुम्ही अधिकृत साइटवर जाऊन ते करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावरही जाऊ शकता.

UIDAI ने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI तुमची POI/POA कागदपत्रे कधीही शेअर करण्यास सांगत नाही. तर myAadhaarPortal द्वारे तुमचे आधार ऑनलाइन अपडेट करा किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्रांना भेट द्या. दरम्यान, UIDAI ने कागदपत्रांचे मोफत आधार अपडेट 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवले ​​आहे. यापूर्वी ही मोफत सेवा केवळ 14 जून 2023 पर्यंत होती.

अशाप्रकारे आधार कार्डमधील डिटेल्स अपडेट करा....- यासाठी आधी अधिकृत आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा.- आता येथे तुमचा आधार क्रमांक आणि OTP टाइप करून लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला जे डिटेल्स अपडेट करायचे आहे, ते शोधा.- आता तुमचा फॉर्म एकदा तपासा आणि सबमिट करा.- ट्रॅकिंगसाठी URN मिळवा, URN हा 14 अंकी क्रमांक आहे, जो आधार डिटेल्स अपडेट करताना दिला जातो.- यानंतर, आवश्यक असल्यास, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार इनरॉलमेंटवर जा.- आता तुम्हाला योग्य डिटेल्ससह अपडेट केलेले कार्ड मिळेल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान