शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

एकच पिन करेल सर्व फोन चार्ज; सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 06:47 IST

सर्व कंपन्यांना द्यावा लागेल एकसमान चार्जिंग पाेर्ट; सरकार करणार नियम

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अनेक फाेनला वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर आणि पिन असलेल्या चार्जिंग केबल्स लागतात. आता ही कटकट कायमची मिटणार आहे. सरकारने सर्व नव्या स्मार्ट फाेन्स आणि टॅबलेटसाठी एकसारखे पिन असलेली चार्जिंग केबल पुरविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, ‘यूएसबी-सी’ प्रकारच्या चार्जिंग पाेर्टला जाेडता येईल, अशा केबल्स पुरवाव्या लागणार आहेत. पुढील वर्षी जून महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

काही ब्रँडसाठी वेगळ्या प्रकारचे चार्जिंग पाेर्ट आणि केबल्स लागतात. त्यांचा त्रास आता कमी हाेणार आहे. केंद्रीय आयटी मंत्रालय येत्या काही आठवड्यांत यासंदर्भात स्मार्ट फाेन उत्पादक कंपन्यांना निर्देश देऊ शकते. समान चार्जिंग पाेर्टच्या सक्तीतून बेसिक किंवा साधे फाेन, वेअरेबल्स जसे की स्मार्ट वाॅच यांंसारखी उपकरणे वगळण्यात आली आहेत.

युराेपमध्ये झाली अंमलबजावणीयुराेपियन युनियनने वर्ष २०२२ मध्ये विविध उपकरणांसाठी एकसमान चार्जर आणि चार्जिंग केबलची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे खर्चही कमी हाेताे; तसेच वाढत्या इलेक्ट्रॅनिक कचऱ्यावरही आळा घालता येताे.

लॅपटाॅपसाठी अंमलबावणी कधी?- स्मार्ट फाेन्स आणि टॅबलेटसाठी २०२५पासून नवे नियम लागू हाेऊ शकतात. तर लॅपटाॅपसाठी याची अंमलबजावणी २०२६पासून हाेईल. - भारताने युराेपियन स्टँडर्डस् स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी अतिरिक्त सहा महिन्यांचा वेळ सर्व उत्पादकांना देण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

५ अब्ज - माेबाइल फाेन ई-कचऱ्यात २०२२मध्ये गेले, असा अंदाज आहे.४१ दशलक्ष  - टन एवढा ई-कचरा माेबाइलद्वारे दरवर्षी निर्माण हाेताे.१६% - इ-कचरा रिसायकल केला जाताे.१०% - इ-कचरा हा माेबाइल फाेनशी संबंधित आहे. भारत आणि चीनमध्ये वापरलेल्या फाेनची सर्वांत माेठी बाजारपेठ आहे.

सी-टाइप पाेर्टचे फायदे काय?- फास्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी सी-टाइप पाेर्ट अतिशय उपयुक्त आहे.- १९९६ पासून या पाेर्टचा वापर हाेत आहे. २०००मध्ये मायक्राे यूएसबी पाेर्टचा वापर सुरू झाला.- सी-टाइपमध्ये २४ पिन असतात. काेणत्याही बाजूने केबल वापरता येते.

कंपन्यांनी केले स्वागतमाेबाइल उत्पादक कंपन्यांनी या नियमाचे स्वागत केले आहे. यामुळे ई-कचरा कमी करण्यास मदत हाेईल. तसेच कंपन्यांचाही खर्च कमी हाेईल. 

टॅग्स :Mobileमोबाइल