शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

स्वस्त आणि सुंदर Oppo स्मार्टफोन! 8GB RAM सह OPPO A96 'इतक्या' रुपयांमध्ये येणार भारतात

By सिद्धेश जाधव | Updated: March 15, 2022 11:51 IST

OPPO A96 Price In India: OPPO A96 हा स्मार्टफोन 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

OPPO लवकरच आपला भारतीय बाजारातील स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवणार आहे. यासाठी कंपनी लवकरच आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत OPPO A96 भारतीयांच्या भेटीला आणू शकते. हा स्मार्टफोन 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

OPPO A96 चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो ए96मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा पंच होल डिजाईन पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच याला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात येईल. हा मोबाईल फोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसाज क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळेल. सोबत एड्रेनो 610 जीपीयू देण्यात येईल. हा फोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.  

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए96 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर असू शकतो. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा देण्यात येईल. पावर बॅकअपसाठी या फोनमधील 5,000एमएएच बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल.  

OPPO A96 ची किंमत 

OPPO A96 चा एकमेव व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. या फोन याच महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. ओप्पो ए96 स्मार्टफोनचे ब्लू आणि ब्लॅक व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.  

हे देखील वाचा:

 

टॅग्स :oppoओप्पोMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड