शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Xiaomi चा नाद करायचा नाय! 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह लो बजेट Redmi 10 ची दणक्यात एंट्री

By सिद्धेश जाधव | Updated: March 17, 2022 15:15 IST

Redmi 10 2022 Price In India: Xiaomi नं Redmi 10 2022 हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे.

Redmi 10 2022 आज भारतीयांच्या भेटीला आला आहे. Xiaomi नं हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह बजेट कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आलेल्या Redmi 10C चा रिब्रँडेड हँडसेट व्हर्जन वाटतो. चला जाणून घेऊया Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi 10 मध्ये 6.71-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 वर चालतो . यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 680 SoC देण्यात आली आहे. तर ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. या देण्यासाठी फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं तर व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB पर्यंत रॅम वाढवता येतो.  

फोटोग्राफीसाठी Redmi 10 2022 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी मोठी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.  

Redmi 10 2022 ची किंमत 

Redmi 10 2022 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेल 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12,999 रुपये देऊन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा फोन Blue आणि Black कलरमध्ये Flipkart, Mi.com आणि रिटेल स्टोर्समधून 24 मार्चपासून विकत घेता येईल.  

 
टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान