शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 18:40 IST

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय.

5G network in India: भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. पण, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतोय. तो म्हणजे, त्यांच्या जुन्या फोनमध्ये 5G चालेल का? विशेषत: अशा लोकांच्या फोनमध्ये, ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक युजर्सच्या 5G स्मार्टफोनमध्येही 5G नेटवर्क येत नाहीये.

भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओ आणि एअरटेलने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह 8 शहरांमध्ये त्यांची सेवा सुरू केली आहे. पण, आता 4G स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात प्रश्न येतोय की, त्यांना जुन्या फोनवर 5G चा लाभ मिळेल का? किंवा त्यांना आता नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल का?

जुना फोन निरुपयोगी होईल?लवकरच संपूर्ण भारतात 5G सर्व्हिस सुरू होणार आहे. पण, 4G फोन वापरणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण, 5G नेटवर्कवर आल्यानंतरही तुम्ही 4G स्मार्टफोन आरामात वापरू शकणार आहात. तुम्हाला तुमच्या जुन्या फोनवर 5G स्पीड मिळणार नाही, परंतु चांगले नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी मिळू शकते.

भारतभर 5G सेवा कधी मिळणार?भारतात 5G सेवा आतापर्यंत फक्त 8 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे आणि तीही पूर्णपणे नाही. युजर्सना फक्त काही भागांमध्ये 5G नेटवर्क मिळत आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्या त्याचा झपाट्याने विस्तार करत आहेत. देशभरात 5G सेवा मिळण्यास मार्च 2024 पर्यंत वेळ लागेल. जिओने एका निवेदनात म्हटले की, पुढील वर्षाच्या अखेरीस त्यांची 5G सेवा संपूर्ण देशात पोहोचेल. तर, एअरटेलचे म्हणणे आहे की, त्यांची 5G सेवा मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होईल.

टॅग्स :5G५जीSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेलJioजिओ