शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

४३ लाख ग्राहकांचा मोबाइल पोर्टेबिलिटीसाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:06 IST

जून महिन्यातील आकडेवारी । कर्नाटक राज्यातील ग्राहकांनी घेतला एमएनपी सेवेचा सर्वाधिक लाभ

खलील गिरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोबाइल क्रमांक कायम ठेवून मोबाइल कंपनीची सेवा बदलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)साठी जून महिन्यात देशभरातील ४३.४ लाख ग्राहकांनी अर्ज केला होता. एमएनपी सेवा सुरू झाल्यापासून या सेवेचा आतापर्यंत ४४.१४९ कोटी ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे ही सेवा देशभरातील मोबाइल ग्राहकांच्या पसंतीस पडल्याचे चित्र आहे.

जून महिन्यात एमएनपी सेवेचा सर्वाधिक लाभ कर्नाटक राज्यातील ४.०७७ कोटी ग्राहकांनी घेतला. त्याखालोखाल या सेवेचा लाभ आंध्र प्रदेशमधील ३.७३१ कोटी ग्राहकांनी घेतला. तामिळनाडूतील ३.७१९ कोटी ग्राहकांनी, राजस्थानच्या ३.४७२ कोटी, महाराष्ट्राच्या ३.२५ कोटी, मुंबईच्या २.२५३ कोटी, पश्चिम बंगालच्या २.२०४ कोटी, मध्य प्रदेशच्या २.८९४ कोटी तर गुजरातच्या २.९४४ कोटी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

याचप्रमाणे आसामच्या ३४ लाख ५० हजार ग्राहकांनी, हिमाचल प्रदेशच्या २१ लाख ५० हजार, तर जम्मू-काश्मीरच्या १० लाख ९० हजार ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मे महिन्यात ४३.७१५ कोटी ग्राहकांनी एमएनपी सेवेचा पर्याय वापरला होता. त्यामुळे एमनपी सेवेला देशभरातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.ब्रॉडब्रँड सेवा वापरणारे ग्राहक वाढलेब्रॉडब्रँड सेवा वापरणाऱ्यांमध्ये मे महिन्याच्या तुलनेत १.३८ कोटी ग्राहकांची भर पडली आहे. मे महिन्यात ब्रॉडब्रँड सेवा वापरणाºया ग्राहकांची संख्या ५८.१५१ कोटी होती ती जूनमध्ये वाढून ५९.४५९ कोटी ग्राहक एवढी झाली. ही वाढ २.२५७ टक्के आहे. ब्रॉडब्रँड सेवा पुरवणाºया कंपन्यांपैकी पाच प्रमुख कंपन्यांद्वारे तब्बल ९८.७२ टक्के ग्राहकांना ही सेवा पुरवली जात आहे. यामध्ये रिलायन्स जिओ ३३१.२६ दशलक्ष ग्राहकांसह प्रथम क्रमांकावर, भारती एअरटेल १२१.४९ दशलक्ष ग्राहकांसह दुसºया क्रमांकावर तर व्होडाफोन आयडिया ११०.५२ दशलक्ष ग्राहकांसह तिसºया क्रमांकावर आहे. याशिवाय बीएसएनएलचे २१.९३ दशलक्ष व टाटा टेलिसर्व्हिसेसचे १.७६ दशलक्ष ग्राहक आहेत. दूरसंचार नियामक आयोगाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल