शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दररोज २ जीबी डेटा अन् ७२ दिवसांची वैधता; BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:16 IST

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

BSNL सातत्याने आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा करत नवीन युजर्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन्सही आणत आहे. आता BSNL ने ७२ दिवसांच्या वैधतेसह एक स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युजरला दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील. 

ट्रायच्या एका अहवालानुसार, बीएसएनलच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने नवीन युजर्स जोडण्यासाठी १ रुपयांचा प्लॅन देखील लॉन्च केला, ज्यामध्ये ३० दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएसचे फायदे होते. बीएसएनएलची ही फ्रीडम ऑफर नवीन ग्राहकांसाठी होती. बीएसएनएलची ही १ रुपयांची ऑफर ३१ ऑगस्ट रोजी संपणार होती, जी कंपनीने आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

७२ दिवसांचा प्लॅनबीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ७२ दिवसांची वैधता मिळते. ४८५ रुपयांच्या या स्वस्त प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळतो. तसेच, बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा आणि १०० मोफत एसएमएससह येतो.

याशिवाय बीएसएनएल आपल्या सर्व मोबाइल ग्राहकांना बीआयटीव्हीची सुविधा देत आहे. यामध्ये ३५० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी अॅप्सची सुविधा मिळेल. एवढेच नाही, तर कंपनीने अलीकडेच बीआयटीव्हीचा प्रीमियम प्लॅन देखील सादर केला आहे. १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४५० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, २३ हून अधिक ओटीटी अॅप्स इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAirtelएअरटेलJioजिओ