शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

 ‘५जी’साठी दीड लाख कोटींच्या बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:26 IST

विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव शनिवारी सलग पाचव्या दिवशी सुरू राहिला. आतापर्यंत ५जी स्पेक्ट्रमसाठी कंपन्यांनी १,४९,८५५ कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ५जी स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांत तीव्र स्पर्धा असल्यामुळे लिलाव प्रक्रिया पाचव्या दिवसांपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी कंपन्यांनी २४ व्या फेरीसाठी बोली लावल्या आहेत. शुक्रवारपर्यंत लिलावाच्या २३ फेऱ्या झाल्या होत्या.

दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी म्हटले होते की, विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे. लिलावास कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे. या लिलावात दूरसंचार विभागाने ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विक्रीसाठी ठेवले आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एयरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्राइजेस या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. लिलावात विकल्या जाणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमची वैधता २० वर्षांची असेल. लो फ्रिक्वेन्सी बँड, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी बँड रेडिओ वेव्हजचा हा लिलाव आहे. यात यशस्वी झालेल्या कंपन्या ५जी दूरसंचार सेवा देतील. 

बयाणा रक्कम जमादूरसंचार विभागाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ५जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी व्होडाफोन आयडियाने २,२०० कोटी रुपये, भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये, अदानी डेटा नेटवर्क्सने १०० कोटी रुपये आणि रिलायन्स जिओने १,४०० कोटी रुपये बयाणा रक्कम म्हणून जमा केले आहेत.