शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक 

By सिद्धेश जाधव | Updated: May 9, 2022 15:35 IST

POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट वेबसाईटवर स्पॉट झाला आहे, त्यामुळे लवकरच हा डिवाइस देशात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.  

शाओमीचा सब-ब्रँड पोको लवकरच आपला नवीन फोन बाजारात लाँच करू शकते. हा डिवाइस कंपनीच्या ‘एफ’ सीरिजमध्ये सादर करण्यात येईल, जी फ्लॅगशिप लेव्हल फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत देण्यासाठी ओळखली जाते. POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट IMEI डेटाबेसमध्ये दिसला आहे. हा फोन चीनमध्ये आलेल्या Redmi K40S स्मार्टफोनचा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. 

टिपस्टर मुकुल शर्मानं दिलेल्या माहितीनुसार, POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट IMEI डेटाबेसवर दिसला आहे. त्याने शेयर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार, हा फोन 220212111RI मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. टिपस्टरनुसार हा हँडसेट POCO F4 नावानं भारतीयांच्या भेटीला येईल. काही दिवसांपूर्वी या सीरिजमधील POCO F4 GT देखील भारतात लाँच होणार असल्याची बातमी आली होती.  

POCO F4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

POCO F4 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा आगामी पोकोफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. POCO F4 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल.  

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 13MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात येईल. आगामी पोको स्मार्टफोन 4,5000mAh च्या बॅटरीसह येईल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड