शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Realme ने सादर केला भन्नाट 5G Phone; 12GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Realme GT Neo 2T लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: October 19, 2021 16:14 IST

Realme GT Neo 2T Price In India: Realme GT Neo 2T चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. परंतु या फोनच्या भारतीय उपलब्धतेची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाही. 

Realme ने चीनमध्ये एका इव्हेंटचे आयोजन करून दोन नवीन फोन सादर केले आहेत. यात GT-series मध्ये Realme GT Neo 2T 5G आणि Realme Q3s चा समावेश आहे. या लेखात आपण Realme GT Neo 2T 5G च्या फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशनची सर्व माहिती घेणार आहोत.  

Realme GT Neo 2T चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Neo 2T मध्ये 6.43-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिवाइसमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 1200 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या RAM आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन Android 11 आधारित Realme UI 3.0 वर चालतो.  

Realme GT Neo 2T च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन 16MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमधील 4,500mAh बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे.  

सिक्योरिटीसाठी रियलमी जीटी नियो 2टी मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यूएसबी-सी पोर्ट, 3.5 मिमी जॅक, ड्युअल 5जी, 4जी, ब्लूटूथ, वायफाय 6, एनएफसी आणि ड्युअल-फ्रीक्वेंसी जीपीएस असे कनेक्टिव्हिटी पर्याय देखील मिळतात.  

Realme GT Neo 2T ची किंमत  

Realme GT Neo 2T चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 1,899 युआन (~ ₹22,200) आणि 8GB RAM 256GB व्हेरिएंटची किंमत 2,099 युआन (~ ₹ 24,500) आहे. तर या फोनच्या 12GB RAM आणि 256GB मॉडेलसाठी 2,399 युआन (~ ₹ 28,074) मोजावे लागतील. चीनमध्ये हा फोन 1 नोव्हेंबरपासून विकत घेता येईल. परंतु या फोनच्या भारतीय उपलब्धतेची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाही. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान