शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:11 IST

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले.

कटक : राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले. भारतीय महिलांनी प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष गटात भारताने इंग्लंडला ३-२ असे तर महिला संघाने सिंगापूरला ३-० असे पराभूत केले. सिंगापूर महिला संघ १९९७ पासून या स्पर्धेत अजिंंक्य राहिला होता. त्यांनी सलग आठ जेतेपद पटकावले होते.पुरुषांच्या सामन्यात भारताच्या शरथ कमल व जी. साथियान यांना पराभूत व्हावे लागल्याने भारत ०-२ ने पिछाडीवर पडला होता. मात्र शुक्रवारी २६ वाढदिवस साजरा करणाऱ्या हरमीत देसाई याने तिसºया सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड मॅकबेथ याला ४-११, ११-५, ८-११, ११-८, ११-८ असे पराभूत केले. त्यानंतर साथियान याने थॉमस जार्र्विस याला ११-२, ६-११, ११-४, ११-४ असे नमविले. निर्णायक लढतीत शरथ आपला अनुभव पणास लावत सॅम्युअल वॉल्करला १५-१३, १२-१०, ११-६ असा धक्का देत भारताचे जेतेपद निश्चित केले.महिलांच्या अंतिम सामन्यात अर्चना गिरिश कामथने सिंगापूरच्या टिन-टिनला ८-११, १३-११, ११-९, ११-९ असे पराभूत करुन संघाला आघाडीवर नेले. हुकमी मनिका बत्राने डेनिस पायेटवर ११-६, ११-४, ११-३ अशी मात करुन भारताची आघाडी भक्कम केली. यानंतर मधुरिका पाटकरने एम्ली बोल्टोनला ११-९,११-७,११-६ असे पराभूत करत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)