शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्टरच्या तंबीनंतर झेडपी प्रशासन नरमले; एकाच दिवसात दिली कृषी विभागाला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 17:42 IST

'लोकमत'च्या बातमीचा परिणाम; पंतप्रधान पुरस्कार प्रवेशिकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला केले होते असहकार्य

सोलापूर: 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तंबी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन नरमले आहे. एकाच दिवसात जलसंधारण कामाची माहिती कृषी विभागाकडे सादर करण्यात आली आहे.

काम करायचे आम्ही आणि पुरस्कार घ्यायचा तुम्ही असा काहीसा सवतीमत्सर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी दाखविल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. लोकसहभागातून जलयुक्त शिवारासाठी सोलापूर जिल्ह्याचे नाव प्रधानमंत्री नाविण्यपूर्ण  पुरस्काराच्या सादरीकरणासाठी आले आहे. याचे कौतुक होत असतानाच गावांमध्ये झालेल्या जलसंधारण कामाची जिल्हा परिषदेकडून माहिती घेण्यासाठी माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी संपर्क साधला.

वायचळ यांनी तातडीने स्वच्छता व पाणी पुरवठ्याच्या अधिकाºयांना माहिती देण्याचे आदेश दिले होते. पण येथील संबंधीत अधिकाºयांनी केवळ सहा गावांची यादी दिली होती. अर्धवट माहितीमुळे कृषी विभागाची पंचायत झाली. जिल्हा परिषदेने दाखविलेल्या या सापत्नभावाच्या वागणुकीबाबत कृषी विभागाने  नाराजी व्यक्त केली होती.  याची दखल घेत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व पाणीपुरवठा प्रशासनाकडून असहकार्य झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी वायचळ यांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक असलेली जलसंधारणाची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून एका दिवसात माहिती मिळाल्याचे कृषि विभागाचे उपसंचालक रविंद्र माने यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद