शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळ; पर्यटन मंत्रालयाचा निर्णय

By appasaheb.patil | Updated: July 23, 2023 15:43 IST

देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील प्रसिद्धी करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करावयाची आहे.

सोलापूर : पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून युवा पर्यटन मंडळे स्थापना करण्यात येत आहेत. देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील प्रसिद्धी करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करावयाची आहे. यातून विद्यार्थी व तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्याची वृत्ती तसेच शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीन जागृती निर्माण करण्यास सहाय्य होईल.

स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये ७ वीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची  स्थापना करावयाची आहे. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षांमध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी १० हजार व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार असे अनुदान 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा/महाविद्यालयांना देण्यात येईल.

राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना करणे व त्याअंतर्गत पर्यटन, प्रसिद्धी विविध उपक्रम राबविण्यासाठी 'युवा पर्यटन मंडळाची' स्थापना करणेबाबत पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय, पुणे यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा