शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाय खरडत खरडत दुचाकीस्वार सांभाळताहेत आपला तोल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

सोलापुरातील रंगभवन ते सात रस्ता;  रस्त्याच्या मध्येच खोल खड्ड्याने वाहनधारकांचे हाल

ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख भागात विकासकामांना सुरुवात करण्यात आलीरंगभवन ते सात रस्ता येथील रस्त्यावरील दोन्ही बाजूने ड्रेनेजच्या कामासाठी मागील महिनाभरात खड्डा पाडून काम करण्यात आलेवर्दळीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्येच खड्डा भरला आहे

सोलापूर : रंगभवन ते सात रस्ता येथील बस डेपोपर्यंत विकासकामांसाठी रस्त्यावर दोन्ही बाजूने मधोमध खड्डा पाडण्यात आला आहे. या खड्ड्यात मातीच माती असल्याने दुचाकीस्वारांचा तोल सुटत आहे. वाहतुकीतून दुचाकी पुढे घेताना त्यांना पाय खरडत खरडतच तोल सांभाळून पुढे जाण्याची वेळ आली आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील प्रमुख भागात विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार रंगभवन ते सात रस्ता येथील रस्त्यावरील दोन्ही बाजूने ड्रेनेजच्या कामासाठी मागील महिनाभरात खड्डा पाडून काम करण्यात आले आहे. त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्येच खड्डा भरला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याशिवाय विविध शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांचा प्रवास या मार्गावरून होतो. रंगभवन परिसरातील चर्चनजीक तर अजूनही काम सुरू असल्याने रस्ता अर्धा बंद करण्यात आला आहे. अर्ध्या रस्त्यावरही खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना येथून वाहने हाकताना प्रचंड सावधानता बाळगावी लागत आहे. 

सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत तर या रस्त्यावर प्रचंड वाहतूक ठप्प होत आहे. विद्यार्थी, कर्मचारी दुचाकी घेऊन येथून जात असताना मध्येच जड वाहनेही येत असल्याने या ठिकाणी वाहतूक सातत्याने ठप्प होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना तर अपुºया व असुरक्षित रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. 

सात रस्ता येथे बस डेपो असल्याने बसचीही वर्दळ या ठिकाणी असते.याशिवाय एसटी बसेसही या मार्गावरुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक चांगलीच व्यस्त झाली आहे. एका बाजूने कामासाठी रस्ता बंद तर दुसºया बाजूला रस्त्याच्या मधोमधच खड्डा पाडला गेल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करण्याची वेळ आली आहे. उड्डाणपूल होणार तरी कधी ?- सोलापूर शहरात रंगभवन परिसरात उड्डाणपूल होणार असे सातत्याने कानावर येत आहे; मात्र प्रत्यक्षात तसे काहीच दिसून येत नाही. या चौकाचे लुक अत्यंत चांगले झाले आहे. त्याचप्रमाणे येथील रस्त्याच्या लूक दिसावा. उड्डाणपुलाचे काम नक्की होणार तरी कधी असा प्रश्न सुमित कांबळे याने उपस्थित केला. 

विकासकामे व्हावीत पण वेठीस धरून नव्हे- स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख व्हीआयपी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामामुळे शहराचा निश्चित विकास होणार आहे; मात्र ही कामे करताना सध्या असलेली व्यवस्था अडचणीत आणून नागरिकांना धोका होईल असे काम करणे उचित ठरणार नाही. रस्त्यावर खड्डे मारल्यानंतर हे खड्डे तरी किमान डांबराने बुजवून घेण्यात यावेत अशी प्रतिक्रिया शैलेश जाधव या युवकाने दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीroad transportरस्ते वाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका