शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

World dog day; सोलापूरच्या तापमानाला होतात लॅब्राडोरसह कारवान अन् गावठी सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:58 IST

जागतिक श्वान दिन;  देशी जातीच्या कुत्र्यांमध्ये चपळता अन् प्रतिकारशक्तीही जास्त

ठळक मुद्देश्वान हा इमानदार प्राणी आहे. तो सध्या परिवारातील सदस्यही बनू पाहत आहेविदेशी जात सोलापुरात पाळणे थोडे खर्चिक असले तरी गावठी जात या वातावरणाला सूट होऊ शकतेश्वान पाळणे हा एक छंद असला तरी ते आपले संरक्षणही करू शकतात. यामुळे प्रत्येकाने हा छंद जपावा व श्वानप्रेमी बनावे

 जगन्नाथ हुक्केरी

सोलापूर : श्वान हा तसा इमानदार प्राणी. मालकाचे स्वामित्व जपत सुरक्षा करणारा रक्षकच. घर असो  वा शेत त्याचा चांगला रखवालदार. तो आजच्या युगात परिवारातील आदर्श सहकारीही झालाय. सोलापूरच्या टेम्परेचरमध्ये गावठी कारवान, पश्मी अन् लॅब्राडोर जातच सूट होऊ शकते. कारण त्यांच्यात प्रतिकारशक्ती अधिक असते.

सध्या सुरक्षेबरोबरच प्रतिष्ठा म्हणून श्वान पाळण्याचे एक नवे  फॅड निर्माण झाले आहे. यात विदेशातील अनेकानेक जातींचे श्वान पाळण्याकडे कल वाढतोय. त्यांच्या संगोपनाचा खर्च जास्त असला तरी त्याच जातीच्या श्वानांचे अधिकाधिक आकर्षण आहे. कारण आपल्या गावठी जातीच्या श्वानांपेक्षा दिसायला ती जात वेगळी व आकर्षक आहे. शिवाय मायाळू, मुलांसोबत बिनधास्त दंगामस्ती करणे, याबरोबरच तो परिवारातील आदर्श सदस्य म्हणूनही वावरतो. यामुळे विदेशी जातीचे श्वान पाळणाºयांची संख्या वाढत आहे. दरमहा पाच ते सहा हजार  रुपये खर्च पेलूनही याचे संगोपन करण्यात येते. श्वानांचा सहवास मिळाला तर ताणही निघून जातो, असे श्वानप्रेमी अनुभव कथन करतात.

विदेशी पामेरियन, डॅशआॅन, डॉबरमन, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर रिट्रीव्ह, डालमेशन, बुल्डॉग, बॉक्सर, ल्हासा अ‍ॅप्सो, कॉकर स्पॅनिअल या जातींचे श्वान सोलापूरच्या उष्ण तापमानामध्ये  राहू शकतात. मात्र त्यांची योग्य निगा घ्यावी लागते. त्यांच्यासाठी उन्हाळा किंवा कडक उन्हामध्ये कूलर किंवा एसीची सोय करणे आवश्यक   आहे. 

या श्वानांच्या संगोपनासाठी विविध तंत्रज्ञानही सध्या बाजारात उपलब्ध असून, खाद्यांचेही अनेक नमुने विकसित करण्यात आले आहेत. यामुळे गावठी जातीला विसरून विदेशी जातीचे श्वान पाळणे आता सोलापुरात सुलभ झाल्याने श्वानप्रेमींची संख्या शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. लॅब्राडोर हा कुटुंब वत्सल असून, डालमेशन बुद्धिमान व प्रसन्न आहे. बॉक्सर जर्मतील जात असून, त्याचा बांधा मजबूत असून, तो चपळ प्राणी आहे.

दीड महिन्याचेच पिल्लू घ्यावे

  • - जन्मल्यानंतर तत्काळ श्वानाचे पिल्लू घेऊ नये. कारण त्याला दीड महिन्यापर्यंत आईच्या दुधाची आवश्यकता असते. लवकर घेतल्यानंतर बाहेरून देणाºया अन्नातून त्याला संसर्ग होण्याची अधिक भीती असते. सुरुवातीला दूध, गरम पाणी थंड करून द्यावे. यामुळे पचण्यास मदत होते.

दुर्मिळ जाती

  • - श्वानामध्ये काही दुर्मिळ जाती आहेत. त्या विकसित कराव्या लागतात. त्यातील ग्रेट डेन व नेपोलियन मॅस्टिक या जाती आहेत. कारवान ही शिकारी जात असून, डॉबरमन हा पोलिसांचा मित्र आहे, असे पशुचिकित्सक दत्तात्रय केंगार यांनी सांगितले.

उन्हाळ््यात उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित आंघोळ घालणे, खाणे कमी असल्याने पाण्यातून ग्लुकोज देणे, पावसाळ््यात डबक्यातील पाणी पिऊ न देणे व उघड्यावरील अन्न खायला देऊ नये. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हिवाळ््यात त्वचारोग, डँड्रप, सर्दी, खोकला होण्याची भीती असल्याने त्याची निगा राखावी.

श्वानांसाठी ब्रश अन् शॅम्पूहीश्वानांची स्वच्छता राखण्यासाठी साबण, शॅम्पू, ब्रश, खेळणी, आर्टिफिशियल बोन, चोक चेन (कंट्रोल करण्यासाठी), जेवणाचे भांडे, फूड सप्लीमेंट, कंगवा, स्टिव स्टिंग उपलब्ध आहेत. रोज सकाळी या श्वानांना ब्रश करून त्यांना नियमित आंघोळ घालणे आवश्यक आहे, अन्यथा ते आजाराची शिकार बनू शकतात.

गड्या गावठीच बराविदेशी जातीचे श्वान आपल्या वातावरणात रमण्यासाठी त्यांची पुरेशी काळजी घ्यावी लागते. मात्र त्या तुलनेत आपले गावठी कुत्रे तंदुरुस्त असल्याने त्यांना तितकी काळजी घेणे गरजेचे नाही. त्यांच्यात प्रतिकारशक्ती जास्त असते. शिवाय मिळेल त्या व शिळ््या अन्नावरही त्यांची गुजराण होऊ शकते. विदेशी जातीच्या श्वानांना मात्र त्यांच्या नियमाप्रमाणेच खाद्य द्यावे लागते, अन्यथा ते आजाराची शिकार बनू शकतात.

श्वान हा इमानदार प्राणी आहे. तो सध्या परिवारातील सदस्यही बनू पाहत आहे. त्याच्या संगोपनाच्या अनेक पद्धती व तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. विदेशी जात सोलापुरात पाळणे थोडे खर्चिक असले तरी गावठी जात या वातावरणाला सूट होऊ शकते. श्वान पाळणे हा एक छंद असला तरी ते आपले संरक्षणही करू शकतात. यामुळे प्रत्येकाने हा छंद जपावा व श्वानप्रेमी बनावे.- दत्तात्रय श्रीरंग केंगारपशुचिकित्सक, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरdogकुत्राTemperatureतापमान