शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अपंग दिन ; दुबळी जरी दृष्टी, निर्मिली स्वयंबळे सृष्टी, जेऊरमधील बालाजी मंजुळे झाले जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:30 IST

नासीर कबीर ।  करमाळा : निसर्ग कधी कधी कुणावर अन्याय करतो. एखाद्याला धडधाकट शरीर देतो तर दुसºयाला अपंगत्व. मात्र ...

ठळक मुद्देबालाजी मंजुळे मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारीवर आहेत

नासीर कबीर । करमाळा : निसर्ग कधी कधी कुणावर अन्याय करतो. एखाद्याला धडधाकट शरीर देतो तर दुसºयाला अपंगत्व. मात्र जगण्याचा दृष्टिकोन मोठा असला तर कसलाही अडथळा आड येऊ शकत नाही, हेच खरे ! जेऊरमधील  बालाजी मंजुळे या दगडफोड्याच्या मुलाने आपला डावा डोळा निकामी असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. गरिबीसोबत आलेले सारे अडथळे पार केले आणि जिल्हाधिकारी होण्याचे आपले  स्वप्न पूर्ण केले. त्या जिद्दी   बालाजी दिगंबर मंजुळे यांचा हा जीवनप्रवास !

घरात अठराविश्व दारिद्र्य. आई पार्वती व वडील दिगंबर हे गावागावांत जाऊन दगड फोडून पोटाची खळगी भरत असे. बालाजींना एकूण सात भावंडे. मुलांनी शिक्षण घ्यावे, मोठे व्हावे, अशी आईवडिलांची मनोमन इच्छा होती. बालाजींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रसंगी घरातील भांडी विकावी लागली, तरी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनीही कधी जिद्द सोडली नाही. त्यांना वाचन आणि अभ्यासाचे वेड भारी. जेऊर येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा, महाविद्यालयातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाचवी ते दहावीपर्यंत त्यांनी पहिला क्रमांक कधी सोडला नाही.

बालाजी जन्मजात डाव्या डोळ्याने अंध नव्हतेच. वीज नसल्याने चिमणीच्या प्रकाशात ही भावंडे अभ्यास करायची. अशातच  सातवीला असताना डोळ्यात गरम काजळी गेली. डाव्या डोळ्याची दृष्टी हळूहळू कमी व्हायला लागली. डॉक्टरांनी त्या डोळ्यावर ताण न देण्याचा सल्ला दिला. बालाजींचे वाचनाचे वेड कमी व्हावे, डोळ्याला इजा पोहोचू नये म्हणून थोरले भाऊ-बहीण पुस्तके लपवून ठेवत असत. तरीही त्यांनी जिद्दीने युपीएससीचा अभ्यास पूर्ण केला. आलेल्या प्रसंगाला तोंड देत परिश्रमपूर्वक आयएएस पदवी २०१२ मध्ये प्राप्त केली. यश पदरात पडले, मात्र व्हायचा तो परिणाम झाला. डावा डोळा निकामी झालाच. 

राजस्थानमध्ये सध्या निरीक्षक- बालाजी मंजुळे मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून, सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारीवर आहेत. यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेश सचिवालयात उपसचिव, कृषी आयुक्त या जबाबदाºया पार पाडल्या आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर