शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

सून असताना मुलगी असल्याचे भासवून मिळवली नोकरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, लाड कमिटी अंतर्गत प्रतिज्ञापत्राचा घेतला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:47 IST

मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

ठळक मुद्देअयाज शेख यांच्या तक्रारीवरून लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिलाशारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असल्याचे निष्पन्न झाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे. मालन गणेश घंटे या मनपाच्या बॉईस प्रसूतिगृहात सफाई कामगार या पदावर नोकरी करीत होत्या. त्यांचे २ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. त्यामुळे १० जानेवारी २००१ रोजी त्यांचे नाव मनपा सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शारदा गणेश घंटे यांनी ६ आॅगस्ट २००१ रोजी लाड कमिटीच्या शिफारशीनुसार मनपात नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालन यांची मुलगी असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक त्या मालन यांच्या सून आहेत. तत्कालीन आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांच्या अर्जाला मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठविले. त्यावर ११ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची सफाई कामगार म्हणून विभागीय कार्यालय क्र. १ कडे नियुक्ती करण्यात आली. पुन्हा ६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची बॉईस प्रसूतिगृहाकडे बदली करण्यात आली. अयाज शेख यांच्या तक्रारीवरून लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिला आहे. त्यात शारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालनबाई घंटे यांच्या त्या सूनबाई आहेत. अर्ज सादर करताना त्यांनी १९ जुलै २०१२ रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्यात माझ्या आईच्या ठिकाणी मला सफाई कामगार म्हणून मनपा सेवेत सामावून घ्यावे, असे नमूद केलेले आहे. वास्तविक त्यांच्या आईचे नाव मृदिका अर्जुन वाघमारे, वडिलांचे नाव अर्जुन वाघमारे व शिक्षण आठवी पास आहे. उमेश घंटे यांच्याशी त्यांचे लग्न झालेले असून, उमेश हे मनपाच्या जयभवानी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शारदा घंटे यांच्या सासूचे नाव मालन व सासºयाचे नाव गणेश घंटे असून, त्यांनी मनपात नोकरी मिळविण्यासाठी सासºयाला पिता भासविलेले आहे.-------------------फाईल चौकशीसाठी पडूनयाप्रकरणी लेखापरीक्षकांनी स्पष्ट अहवाल दिलेला असतानाही सामान्य प्रशासन विभागात ही फाईल चौकशीविना पडून आहे. कंत्राटी नियुक्तीनंतर मनपाचे जावई म्हणून ठिय्या मारलेल्या अनेकांना आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घरचा रस्ता दाखविण्यास सुरुवात केली आहे. लाड कमिटीचा फायदा घेत मनपा कर्मचाºयांच्या संगनमताने कायम नोकरीवर घुसलेल्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका