शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा 

By संताजी शिंदे | Updated: August 29, 2023 16:41 IST

राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

सोलापूर: पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा, एमपीएससी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शिरूर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन आजारी दिला आहे. राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पेपर फुटी संदर्भात विधिमंडळात कायदा करावा आणि २०१९ ची तलाठी भरती  प्रक्रिया संदर्भात एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यानंतर २०२३ ची तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा गैरप्रकार आढळून येत आहे.  राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर घोटाळाबाजांचा सुळसुळाट वाढत आहे. दलाल,भ्रष्ट अधिकारी आणि घोटाळाबाज्यांच्या माध्यमातून पेपर फोडण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे ही या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे. ही परीक्षा ताबडतोब थांबून पुन्हा एकदा नामांकित व चांगल्या कंपनीला परीक्षा घेण्यास परवानगी देऊन लाखो विद्यार्थ्यांना जे की होतकरू प्रामाणिक, योग्यताधारक आहेत अशा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा परिक्षा संदर्भात आम्हांस रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. 

शासन विद्यार्थ्यांचे आर्थिक खच्चीकरण करत आहे -- महाराष्ट्र शासनाच्या सर्वच परीक्षांमध्ये असे घोटाळे होत असेल तर ही परीक्षा घेऊन प्रशासन गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा महसूल गोळा करून विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक खच्चीकरण करत आहे. - सोलापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर सुद्धा शासनाने कडक असे बंदोबस्त ठेवला पाहिजे जर परीक्षा पारदर्शकपणे नियोजनबद्ध व वेळेत घेऊन न्याय देता येत नसेल तर आम्हाला उच्च न्यायालयात जावा लागेल व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर  लवकरात लवकर आम्ही उतरणार आहोत, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी