शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीसाठी नेमके मतदार कोण ? निवडणूक प्रक्रियेत पेच, निवडणूक कार्यालयाचे प्राधिकरणाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:16 IST

नव्या सहकार कायद्यानुसार ज्याच्या नावावर सातबारा तो सोसायटीचा सभासद व  बाजार समितीचा मतदार अशी घोषणा झाली असली तरी एका सातबारा उताºयावर असणाी अनेक नावे  किंवा अनेक सातबारा उताºयावर असणारी एकाचे नाव  यापैकी नेमकी मतदार कोण अन् मतदारांची यादी कशी अंतिम करायची याबाबत निवडणूक यंत्रणा पेचात पडली

ठळक मुद्दे७/१२ आणि ८ अ उताºयावरून मतदारांची नावे निश्चित केली जाणारमतदार यादीबद्दलही अनेक प्रश्न आहेत. त्याचे स्पष्टीकरण आम्ही प्राधिकरणाकडून मागवले : एस.व्ही. धुमाळ

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : नव्या सहकार कायद्यानुसार ज्याच्या नावावर सातबारा तो सोसायटीचा सभासद व  बाजार समितीचा मतदार अशी घोषणा झाली असली तरी एका सातबारा उताºयावर असणाी अनेक नावे  किंवा अनेक सातबारा उताºयावर असणारी एकाचे नाव  यापैकी नेमकी मतदार कोण अन् मतदारांची यादी कशी अंतिम करायची याबाबत निवडणूक यंत्रणा पेचात पडली असून  त्यांनी  याबाबत निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवून निश्चित अशी मार्गदर्शक  तत्वे मागवली आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत १० गुंठ्यावरील शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याचे सांगत असले तरी मतदार यादी नेमकी करायची कशी? यासह अनेक प्रश्न जिल्हा निवडणूक कार्यालयासह बाजार समिती यंत्रणेच्या मनात घोळत आहेत. यावरून मतदार यादीत अनेक घोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हा घोळ सोडविण्यासाठी  निवडणूक कार्यालयाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना मतदानाचे अधिकार होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून आता  १० आर हून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु, संयुक्त खातेदारांची नावे मतदार यादीत घेण्यासाठी     कोणते निकष लावायचे. ----------------------------------आधार आणि मतदान ओळखपत्र महत्त्वाचे- ७/१२ आणि ८ अ उताºयावरून मतदारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. अनेक उताºयांवर १८ वर्षे वयाखालील मुलांची नावे आहेत. मतदार यादीत या मुलांच्या नावांचा समावेश झाल्यास या नावांवर आक्षेप घेता येईल, परंतु आक्षेप घेतलाच नाही तर या मुलांकडूनही मतदान होउ शकते. हे रोखण्यासाठी आधार आणि मतदान ओळखपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भातही लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाकडून केली जाते. या निवडणुकीबाबत निर्माण होणाºया प्रश्नांबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागत असतो. -------------------------बाजार समितीची निवडणूक प्रथमच वेगळ््या पध्दतीने होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्याची माहिती सहकार प्राधिकरणाकडून घेत आहोत. मतदार यादीबद्दलही अनेक प्रश्न आहेत. त्याचे स्पष्टीकरण आम्ही प्राधिकरणाकडून मागवले आहे. एस.व्ही. धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक