शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पांडव जब कौरव बन जाते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:00 IST

शनिवारी मुंबईत होतो. तेथील वर्तमानपत्रात ‘मुलगी झाल्यामुळे सासरच्या लोकांनी केला विवाहितेचा छळ’ ही बातमी वाचली. प्रवास करून सोलापूरला उशिरा ...

शनिवारी मुंबईत होतो. तेथील वर्तमानपत्रात ‘मुलगी झाल्यामुळे सासरच्या लोकांनी केला विवाहितेचा छळ’ ही बातमी वाचली. प्रवास करून सोलापूरला उशिरा पोहोचलो. सकाळी रविवारचा लोकमत उघडला आणि पहिल्याच पानावर ‘मुलगी झाल्याच्या कारणावरून सोलापुरात पत्नीस मारहाण’ ही बातमी वाचली आणि मन खिन्न झाले. वाचक हो, मुलगी होणे यात त्या मातेचा काय दोष? मुलगा होणे अगर मुलगी होणे हे पुरुषाच्या गुणसूत्रावरच अवलंबून असते. हे कधी आपल्या लोकांना कळणार? विनाकारण विवाहितेला त्रास दिला जातो. दोष द्यायचा झाला तर त्या पुरुषालाच द्यायला पाहिजे. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असाच हा प्रकार आहे. अशा बातम्या वाचल्यानंतर ती केस माझ्या डोळ्यासमोर येते. 

मोठ्या भावाला पाच मुलेच तर धाकट्या भावाला चार मुलीच होत्या. चांगले सुखी एकत्र कुटुंब होते. त्यांच्या आई-वडिलांचा मोठ्या मुलाकडे ओढा, कारण मोठ्याला पाच मुलेच होती. धाकट्याला अगर त्याच्या पत्नीला घरी दुय्यम वागणूक होती. कारण काय? तर त्यांना फक्त मुलीच होत्या. याबाबत आपल्या समाजाची धारणा खूप विचित्र आहे. मुलाला तुपाची वाटी तर मुलीला रिकामीच वाटी! मोठा भाऊ मुलांना पाच पांडव म्हणून संबोधायचा. घरी कोणी आले तर त्यांची ओळख तशीच करून देत होता. घरातदेखील मोठ्या सुनेचे वर्चस्व. धाकट्या सुनेला काही किंमत नव्हती. पदोपदी तिचा अपमान व्हायचा. कौटुंबिक समारंभात ही पाच पांडवांच्या आई-बापाला मान-सन्मान मिळत होता. चार मुलींच्या आई-बापाला दुय्यम वागणूक मिळत असे. मालमत्तेच्या वाटणीत धाकट्याला दुय्यम न्याय दिला. मोठ्याला जास्त संपत्ती दिली. कारण काय, तो ठरला पाच पांडवांचा बाप! पाच पांडवांना दर्जेदार शाळेत घातले. तर चार मुलींना साध्या शाळेत घातले. बघा किती भेदभाव. धाकट्या सुनेने याबाबत सासूला विचारले तर सासू म्हणाली, पोरींना शहाणपण आल्यानंतर त्यांचे लगेच उरकून टाकायचे. पोरी शिकून काय दिवे लावणार? सासूचे हे बोलणे धाकट्या सुनेला खूप टोचत असे. मुली हुशार होत्या. त्यांच्या शाळेतील शिक्षिका तिला सांगत होत्या, मुली हुशार आहेत. त्यांना चांगल्या शाळेत घाला. मुली मोठ्या होणार आहेत. 

धाकट्या सुनेने घरी विषय काढला. मुलींना चांगल्या शाळेत घालण्याबद्दल आग्रह धरला. घरातील सर्वांनी तिचे सांगणे उडवून लावले. तिचा नवरा गरीब स्वभावाचा़ तिने नवºयाला सांगितले, आपण आपल्या वाट्याला आलेली मालमत्ता विकू आणि माझ्या माहेरी जाऊन राहू. तेथे मुलींना चांगले शिक्षण देऊ. नवरा तयार नव्हता. पण कसाबसा तयार झाला. पडत्या किमतीला मालमत्ता विकून ते सर्वजण माहेरी जाऊन राहिले. तिने मुलींना चांगल्या शाळेत घातले. किरकोळ नोकरी-चाकरी करीत दोघाही  नवरा-बायकोंनी जिद्दीने मुलींना शिकवले.

इकडे ‘पाच पांडव’ घरात सर्वांच्या लाडात वाढत होते. नेहमी कौतुक होत असल्याने हे पाच पांडव फारच शेफारले होते. तिकडे त्या मुलींची शिक्षणाची ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ वेगाने धावत होती. इकडे पाच पांडवांची शिक्षणाची ‘पॅसेंजर’ रखडत-रखडत कशीबशी चालली होती. आई-बापदेखील आपल्या पोरांना शिकून काय करायचे आहे? धंद्यावर तर बसायचे आहे, असे म्हणून मुलांच्या शिक्षणाबद्दल अनास्था दाखवत राहिले.  

इकडे त्या चार मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतलेली होती. चारही मुली उच्चशिक्षित झाल्या. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागल्या. पुण्याला एकाच गृहसंकुलात चारही मुलींनी फ्लॅट घेतले. आई-वडिलांसाठीदेखील त्याच संकुलात फ्लॅट घेतला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. इकडे मात्र ‘पांडव नगरी’त पाच पांडवांचा अक्षरश: धुमाकूळ चालू होता. आज पांडवांचे वृद्ध आई-वडील स्वत:च्याच घरात ‘वनवासी’ म्हणून दिवस कंठत आहेत. इकडे मात्र फक्त मुलीच असलेले ते आई-वडील सुखा-समाधानात डुंबत आहेत. त्यांना मिळालेले जावई देखील तेवढेच भले आणि कर्तृृत्ववान आहेत. एका प्रख्यात इंग्रजी लेखकाने लिहिले आहे; त्याचे मराठी भाषांतर असे, मुलगा हा मुलगा असतो तो बायको येईपर्यंत. परंतु मुलगी ही मुलगी असते संपूर्ण आयुष्यभर.सांगा, मुलगा पाहिजे का मुलगी? - अ‍ॅड. धनंजय माने

टॅग्स :Solapurसोलापूर