शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

कर्तृत्ववान माणसांमुळे सुसंस्कृत समाज घडतो, सुशीलकुमार शिंदे यांचे मत, हन्नूरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नेतेमंडळींनी मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:48 IST

हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देकुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होतीप्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरचपळगाव दि १० : स्वर्गीय काशिनाथ भरमशेट्टी हे एक निगर्वी, सुस्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने या परिसराचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच सुसंस्कृत समाज घडतो. त्यांचे अधुरे कार्य पुढे नेणे हीच त्यांना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भरमशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त के. बी. प्रतिष्ठानतर्फे त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी होते. यावेळी आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. शामल बागल, शिवशरण पाटील, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे,सभापती सुरेखा काटगाव,कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा, बाळासाहेब मोरे, सुदीप चाकोते, चेतन नरोटे, सिद्धार्थ गायकवाड, दिलीप बिराजदार, विश्वनाथ भरमशेट्टी, राजू भरमशेट्टी, डॉ. नेहा भरमशेट्टी, क्रांती भरमशेट्टी, सचिन भरमशेट्टी, व्यंकट मोरे, बब्रुवाहन माने उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. नेहा भरमशेट्टी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.मधुकर जाधव यांनी संपादित केलेल्या ‘काशिनाथ एक दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. के. बी. प्रतिष्ठान बहुउद्देशीय समाजसेवा प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उद्घाटनही आ. म्हेत्रे यांनी केले.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद भरमशेट्टी यांच्याकडे होती.त्यांच्या हयातीच्या काळात त्यांनी कुरनूर धरण, आठ एकर स्लॅबबद्दल प्रभावीपणे काम करून या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. यावेळी सिद्रामप्पा आलुरे, आ. सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील यांची भाषणे झाली. काशिनाथ भरमशेट्टी यांच्यामुळेच आ. म्हेत्रे व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याचे पाटील यांनी सांगितले. अशपाक बळोरगी,भीमा कापसे, अण्णाप्पा अळ्ळीमोरे, राजशेखर पाटील, काशिनाथ गोळ्ळे, भारत जाधव, स्वामीनाथ हरवाळकर, निलप्पा घोडके, सोपान निकते, शैलेश पाटील, इसहाक पटेल, डॉ. आप्पासाहेब उमदी, चंद्रकांत जंगले, संजय बाणेगाव, सातलिंग शटगार, अरुण जाधव, बसवराज सुतार, सोपान निकते, मल्लिनाथ भरमशेट्टी, विठ्ठल भरमशेट्टी, आप्पाशा हताळे, अनिल बिडवे, निरंजन हेगडे, नरेंद्र जंगले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे व हत्तुरे यांनी केले तर  कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीलेश भरमशेट्टी यांनी मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे