शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

सोलापूर स्मार्ट सिटीत होतोय टँकरने पाणीपुरवठा, हार्टलॅन्डमधील प्रकार,  जलवाहिनीचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:26 PM

स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या या भागातील रहिवाशांना अवेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहेसहायक अभियंता डंके यांनी ही झोपडपट्टी घोषित नसल्याने सुविधा पुरविण्याबाबत अडचण येत असल्याचे स्पष्टजलवाहिनीसाठी ५ लाख निधीची मागणी केली. पण अतिक्रमित वसाहत असल्याने सुविधा देता येत नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे : श्रीदेवी फुलारे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५  : स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या हार्टलॅन्ड परिसराला चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागणी करूनही परिसरात जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेतून २१ कोटी रुपये खर्चून रंगभवन ते पार्क चौक हा स्मार्ट रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याच्या हाकेच्या अंतरावर ह. दे. प्रशालेच्या पाठीमागे ख्रिश्चन मिशन ट्रस्टच्या जागेवर ४०० कुटुंबांची वसाहत निर्माण झाली आहे. पण गेल्या २0 वर्षांत या वसाहतीला पाणी दिले जात नाही. आंदोलनानंतर वसाहतीच्या एका बाजूला सार्वजनिक नळ कनेक्शन देण्यात आले. दोन बोअर घेण्यात आले, पण ते बंद स्थितीत आहेत. त्यामुळे महिलांनी आंदोलन केल्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण टँकर ठेकेदाराला मनपाने बिल न दिल्याने टँकरही तीन दिवसाआड येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. या परिसरातील नागरिकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी अमेरिकन मराठी मिशन ट्रस्टचे चेअरमन नितीन नवगिरे यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तपासणीसाठी आलेल्या पथकाला येथील लोक उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनाला आल्यावर तातडीने २0 सीटचे शौचालय बांधून देण्यात आले. पण पाण्याची सुविधा नसल्याने शौचालयाचा वापर कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात जलवाहिनी टाकण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दाखल घेतली जात नाही. स्मार्ट सिटी योजनेच्या एरियात असलेल्या या भागातील रहिवाशांना अवेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत खुलासा करताना झोन अधिकारी शांताराम आवताडे यांनी टँकरचा पाटा तुटल्याने समस्या निर्माण झाली होती. नगरसेवक चेतन नरोटे यांनी माहिती दिल्यावर टँकर पूर्ववत करण्यात आला असल्याचे सांगितले. सहायक अभियंता डंके यांनी ही झोपडपट्टी घोषित नसल्याने सुविधा पुरविण्याबाबत अडचण येत असल्याचे स्पष्ट केले. ----------------------येथील नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा केला. दोन बोअर घेतले. जलवाहिनीसाठी ५ लाख निधीची मागणी केली. पण अतिक्रमित वसाहत असल्याने सुविधा देता येत नसल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीतील एरिया असल्याने याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार आहे. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका