शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या विकासास प्राधान्य : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:08 IST

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाºया वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे.

ठळक मुद्देवारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास पंढरपूरातील विविध मठांना महसूलमंत्री भेटी दिल्यामठातील महाराज मंडळनी आपआपल्या समस्यां महसूल मंत्र्यांना सांगितल्या

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ३१ : पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने येणाºया वारकरी-भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासन  वारकरी केंद्र बिंदू मानून पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळांचा विकास करीत असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.            कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापुजेसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूर येथे  आले असून त्यांनी यावेळी पंढरपूरातील विविध मठांना भेटी दिल्या त्या प्रसंगी मठातील महाराज, वारकरी,फडकरी यांच्या संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आ़ प्रशांत परिचार, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, शेखर चरेगावकर, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व वारकरी-भाविक उपस्थित होते.            महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढपुरातील मच्छिंद्र महाराज मठ, मारुती बुवा कराडकर मठ,  देहूकर महाराज मठ, तात्यासाहेब वासकर महाराज मठ, आप्पासाहेब वासकर महाराज मठ, यादव महाराज मठ यासह अन्य मठांना भेटी देवून मठातील महाराजांकडून वारी, वारकºयांच्या समस्या याबाबत चर्चा केली. यावेळी महसूल मंत्री  पाटील म्हणाले, मठ आणि परिसरात असणाºया समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल.  पंढरपुरातील स्वच्छता, चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता ही कामे प्राधान्याने केली जातील.            यावेळी मठातील महाराज मंडळनी आपआपल्या समस्यां महसूल मंत्र्यांना सांगितल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल असे महसूल मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.