शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात मतदानाचा टक्का घटला, मंगळवेढ्याचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 15:29 IST

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ; सुधाकरपंत परिचारक, भारत भालकेंची प्रतिष्ठा पणाला

ठळक मुद्दे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानात ४ टक्के घट झाली पावसाळी वातावरणाचा मतदानावर काहीअंशी परिणाम शहरात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया

सतीश बागल पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी यंदा एकूण ३ लाख ३३ हजार ५८९ पैकी २ लाख ७ हजार ६२२ (७१.२३) टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गतवर्षी हा आकडा ७५.६७ टक्के इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानात ४ टक्के घट झाली आहे. पावसाळी वातावरणाचा मतदानावर काहीअंशी परिणाम झाल्याचे दिसून आले. दुपारी चार वाजल्यानंतर अनेक ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने बाहेर आले. त्यामुळे शहरात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 

 यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे सुधाकरपंत परिचारक, राष्टÑवादी काँग्रेसचे भारत भालके, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे निवडणूक मैदानात असल्याने पांडुरंग परिवाराने आपली ताकद पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात लावली होती. भारत भालके यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारी घेत या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली.

पंढरपूर शहर व तालुक्यातील २१ गावांमध्ये परिचारक व भालके असा सामना पाहायला मिळाला, तर मंगळवेढा मतदारसंघात समाधान आवताडे व शिवाजीराव काळुंगे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. शेवटच्या चार दिवसांत आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याने आता मंगळवेढा शहर व तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पावसाचा परिणाम- पावसाळी वातावरणामुळे अनेक मतदान केंद्रांच्या आवारात पाणी साचलेले होते, तसेच चिखल झाला होता. यातून मार्ग काढत मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी जावे लागत होते. अशा स्थितीतही मतदानासाठी युवा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असल्याने सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकpandharpur-acपंढरपूर