शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील मतदारांची आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार, ३२९० अधिकाºयांची नियुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:11 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार छायाचित्र यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी निर्दाेष करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र ...

ठळक मुद्दे१५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणारमहाविद्यालये, मंडळांचे सहकार्य३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार छायाचित्र यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी निर्दाेष करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मतदार नोंदणीविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत घरोघरी भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत. अधिकाºयांनी या भेटीत स्थलांतरित आणि मयत झालेल्या मतदारांची नावे वगळायची आहेत. शिवाय मतदारांचे नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो यामध्येही आवश्यक त्या दुरुस्त्या करायच्या आहेत. मतदारांची, कुटुंबाची माहिती व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ------------------आॅनलाईन अर्ज कराच्मतदार नोंदणीची सोय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलमध्ये करण्यात आली आहे. या पोर्टलमध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतील. मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘ईआरओ एनईटी’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याद्वारे संबंधित अर्जदारांना आपला अर्ज मंजूर झाला की नाही, आपले नाव यादीत समाविष्ट झाले की नाही, याची माहिती मोबाईलवर मिळू शकते.---------------------महाविद्यालये, मंडळांचे सहकार्य- मतदार नोंदणीच्या कामात सहकार्य मिळावे यासाठी तहसीलदारांमार्फत तालुक्यातील नवरात्र मंडळे, गणपती मंडळे, तरुण मंडळे यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करून घेण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि प्राचार्यांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.----------------३२९० अधिकाºयांची नियुक्ती - प्रारुप मतदार याद्या ३ आॅक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्र, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३२९० मतदार यादी भाग असून प्रत्येक भागाकरिता एक याप्रमाणे ३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.