शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुलं; रोज १ हजार भाविकांना घेता येणार दर्शन

By appasaheb.patil | Updated: November 16, 2020 08:42 IST

ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच मिळणार दर्शन; पददर्शन नव्हे मुखदर्शन मिळणार

सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.

शासनाने तोंडावर मुखपट्टी(मास्क), योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली आहे.राज्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली.यानंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सहअध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनास परवानगी दिली आहे.  तसेच सर्व भाविकांना दर्शनासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची वेळ निश्चित करावी लागणार आहे.  ज्या भाविकांनी अशा पद्धतीचे दर्शन बुकिंग केले त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे.याशिवाय येणाऱ्या भाविकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझरचा वापर, तोंडावर मुख्पट्टी(मास्क) असणे बंधनकारक आहे.एखाद्या भाविकाला ताप, सर्दी खोकला आदी लक्षणे दिसून आली तर त्या भाविकाला दर्शनास सोडण्यात येणार नाही.याशिवाय ६५ वर्षापुढील, १० वर्षाखालील आणि गर्भवती महिलांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी नाही.प्रत्येक तासाला १०० भाविक दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचा बैठकीत निर्णय झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्याDiwaliदिवाळी