शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिर समिती, सात मानाच्या पालख्या सुरू करणार रेडिओ वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आता बदलत्या काळानुसार ‘संतवाणी’ या रेडिओ वाहिनीची निर्मिती करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. ...

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आता बदलत्या काळानुसार ‘संतवाणी’ या रेडिओ वाहिनीची निर्मिती करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये मानाच्या सात पालखींची संस्थानेदेखील सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांनी दिली.

खेड्यातील कौलारूच्या घरात बसून ते थेट परदेशातील आलिशान कार्यालयात बसून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन घेणे यामुळेच सहज शक्य आहे. मागील काही वर्षांपासून तंत्रज्ञानामुळे पंढरीची वारीदेखील जगभरात पोहोचली आहे. या सर्वांचा विचार करून कोल्हापूर येथील धैर्यशील पाटील यांना संतवाणी कम्युनिटी रेडिओ निर्मितीची कल्पना सुचली.

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव आदीं मानाच्या सात पालख्या निघतात, तेथून ही सुरू केले जाणार आहे. याव्दारे धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, शासकीय माहिती तसेच आपत्ती निवारण आदींविषयी माहिती दिली जाणार आहे.

पंढरीत सप्ताह, कीर्तन, प्रवचन, जयंती, पुण्यतिथी सोहळ्याचे कार्यक्रम आदींची या ठिकाणी रेलचेल असते. हे सर्व कार्यक्रम या रेडिओव्दारे ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. किंबहुना गावात कोठेही होणारे कार्यक्रम घरबसल्या ऐकण्याची संधी मिळणार आहे. कीर्तनकार, प्रवचनकार यांना एक मोठे व्यासपीठ याव्दारे मिळेल. मानाच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर असताना, भाविकांना सरकारी सूचना किंवा भाविकांना माहिती देण्यासाठी या रेडिओचा उपयोग केला जाणार आहे.

शासनाची अधिकृत माहिती देण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. या रेेडिओची रेंज २५ कि.मी. पर्यंत राहणार आहे. तसेच मंदिर समिती व सात मानाच्या पालखी संस्थानच्या स्वतंत्र वेबसाईट असून, याला संतवाणी रेडिओची लिंक जोडल्यास जगभरात कोठेही हे रेडिओ चॅनल ऐकणे शक्य आहे.

याबाबत धैर्यशील पाटील यांनी सातही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिली आहे. त्यांनीदेखील यास तत्त्वतः मान्यता दिली असून, नुकत्याच पंढरपूरच्या मंदिर समितीसमोर त्यांनी हा आराखडा मांडला आहे. भाविकांसाठी हे प्रभावी माध्यम असल्याने यास मान्यता मिळणार आहे. याबाबतीत मंदिर समिती पुढाकार घेणार असून, यासाठी येणारा खर्च व तांत्रिक परवानगीसाठी शासनाच्या प्रतिनिधींची भेटदेखील घेण्यात येणार आहे. यावर सर्व संत संस्थानचे प्रतिनिधी व पंढरीची मंदिर समिती यांची लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.