शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसुरक्षा यंत्रणामुळे गावांना सुरक्षित कवच; गुन्हेगारीला पायबंद लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 06:51 IST

३५०० हजार गावाचा सहभाग : ४९ हजारांहून अधिक तक्रारी निकाली

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर हा प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये वायरलेसप्रमाणे काम करणार आहे. आपल्या गावांमधील गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी व गावातील प्रत्येक नागरिकाला  सुरक्षित करण्यासाठी सर्व गावांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून  लाभ घ्यावा, असे आवाहन या यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी केले

   मंगळवेढा तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसुरक्षा दलाचे प्रमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पिंगळे, , सत्यजित आवटे, वाघमारे, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

गोर्डे पुढे म्हणाले, आजपर्यत ३ हजार ५०० गावे यामध्ये सहभागी झाली असून, ७ लाखांहून अधिक तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.सोलापूर जिल्हयातील २५० गावे या योजनेला जोडली असून ३१ आक्टोबर अखेर  एसपी तेजस्विनी सातपुते व सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली  संपूर्ण जिल्हा कार्यान्वित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला..ग्रामसुरक्षा यंत्रणा कनेक्ट करण्यासाठी १८००२७०३६०० हा नंबर असून  यावर कॉल करून माहिती दिल्यास तात्काळ गावातील ग्रामस्थांचे मोबाईल खणखणतात व पोलिसांनाही याची माहिती मिळत असल्यामुळे सगळयाच्या गराडयात ते दरोडेखोर सापडत असल्याने त्याची यामधून सुटकाच होत नसल्याचे ते म्हणाले.

गावातील प्रत्येक नागरिकाने या यंत्रणेत आपला नंबर समाविष्ट करून घ्यावा. या व्यतिरिक्त गावातील महत्त्वाचे संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचे काम देखील या यंत्रणेतून होणार आहे. ग्रामसभेची सूचना, रेशनिंग बाबतची माहिती व अन्य महत्त्वाच्या सूचना यामधून देता येतील. मात्र संदेश देताना संदेश देणाऱ्याने स्वतःचे नाव, ठिकाण व संदेश स्पष्ट शब्दांत द्यायचा आहे.या यंत्रणा ही स्वंयचलित असल्याने येणारा प्रत्येक कॉलची पडताळणी करून तो संदेश पुढे जसाच्या तसा पोहचविला जातो. फेक मेसेज , कॉल टाळता येणार आहेत.ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्यासाठी कुठलाही खर्च अपेक्षित नाही. लागणारी फि ग्रामपातळीवर ग्रामपंचायत भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रम्हपुरीचे सरपंच मनोज पुजारी, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष शशांक गवळी, ग्रामसेवक संजय शिंदे, मरवडेचे संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गावातील प्रत्येक नागरिक सुरक्षित....

गाव परिसरात होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले बेपत्ता होणे, वाहनचोरी, गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग अथवा जळिताच्या घटना यासह कोणतीही दुर्घटना व गावातील महत्त्वाचे संदेश गावातील सर्व नागरिक व सोबतच परिसरातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, सरकारी यंत्रणा यांना त्यांच्या मोबाइलवर या यंत्रणेत सहभागी झाल्यानंतर एकाच वेळी संदेश देणाऱ्या व्यक्तीकडून जाणार असल्याने यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा गावासाठी सुरक्षा कवच आहे  अशी माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी दिली.

  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस