शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

By आप्पासाहेब पाटील | Updated: November 2, 2025 05:55 IST

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पोटा (बु.) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर मानाचे वारकरी ठरले

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाच्या मुख्य स्रोताच्या केंद्रस्थानी आहे पंढरीचा विठुराया. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पायी माथा टेकण्यासाठी असंख्य वारकरी तसेच भक्त मोठ्या श्रद्धेनं पंढरपुरात येतात. जणूकाही ‘विठो पालवीत आहे’ या भावनेनं त्याच्या पायी माथा टेकतात. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पोटा (बु ) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला.

दरम्यान, रामराव वालेगावकर यांची पोटा येथे शेती आहे. त्यांचा मूळ व्यवसाय शेती हाच आहे. मागील वीस वर्षापासून ते पंढरपुरात होत असलेल्या वर्षातील प्रमुख चार वारीत ते सहभागी होतात. त्यांना दोन मुलं असून सुना नातवंड असा परिवार आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते शनिवारी पंढरपुरात दाखल झाले. शनिवारी सकाळी ते विठ्ठलाच्या दर्शनाची आज घेऊन दर्शन रांगेत उभा राहिले, दिवसभर विठुनामाचा गजर करत दर्शन रांगेत उभा असलेल्या रामराव यांना मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून बोलाविण्यात आले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. कशाचीही अपेक्षा न करता मागील वीस वर्षापासून करीत असलेल्या वारीतील सहभागाचा हे फळ मिळाल्याचं रामराव यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer couple honored with Maha Puja alongside Deputy Chief Minister.

Web Summary : Ramrao Walegaonkar and his wife received the honor to perform the annual Maha Puja at Pandharpur temple with Deputy Chief Minister Shinde. Farmers from Nanded, they've participated in the annual pilgrimage for twenty years, a reward for their devotion.
टॅग्स :ekadashiएकादशीPandharpurपंढरपूरEknath Shindeएकनाथ शिंदे