शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 13:19 IST

१७१ रुपये प्रति किलो: आता दर गुरुवारी होणार सोलापूर बाजार समितीत लिलाव

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २४ फेब्रुवारीपासून बेदाणा लिलावास सुरुवातसुरुवातीला दररोज सुमारे दहा टन बेदाण्याची आवक होत होती बेदाण्याला १५0 ते १६0 रुपये प्रतिकिलो भाव सुरू

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या बेदाणा लिलावात गुरुवारी या हंगामातील विक्रमी म्हणजे १७१ रुपये प्रति किलो भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २४ फेब्रुवारीपासून बेदाणा लिलावास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला दररोज सुमारे दहा टन बेदाण्याची आवक होत होती.  यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून बेदाण्याला १५0 ते १६0 रुपये प्रतिकिलो भाव सुरू आहे. आता सर्वत्र बेदाणा शेडचे काम वाढल्याने दररोज १५ ते २0 टनची आवक सुरू झाली आहे. बाजार समितीतर्फे दर शनिवारी बेदाण्याचे लिलाव केले जात होते. पण व्यापाºयांची मागणी लक्षात घेऊन ८ मार्चपासून लिलाव वेळेत बदल करण्याचा निर्णय सचिव मोहन निंबाळकर यांनी घेतला. त्याप्रमाणे आज पहिल्याच दिवशी झालेल्या लिलावात व्यापाºयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथील शेतकरी दयानंद हल्ले यांच्या सुपर क्वालिटीच्या बेदाण्याला विक्रमी म्हणजे १७१ रुपये किलो भाव मिळाला. उत्तम बेदाणा काढल्याबद्दल रक्षा ट्रेडिंग कंपनीचे संचालक शिवानंद शिंगडगाव यांनी त्यांचा सन्मान केला. बेदाणा लिलावास यावर्षी सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ येथील शेतकरी बेदाणा विक्रीसाठी बाजार समितीकडे आणत आहेत. बेदाणा खरेदीसाठी नाशिक, सांगली, तासगाव, पंढरपूर, विजापूर येथील व्यापारी येत आहेत. व्यापाºयांच्या मागणीवरूनच बेदाणा लिलावाचा दिवस बदलला आहे. पंडित अंबारे, शिवानंद शिंगडगाव, अरुण बिराजदार आणि विश्वजीत हेले या चार अडत्यांकडे सध्या बेदाण्याचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या बेदाणा निर्मितीला वेग आला आहे. आवक आणखी वाढणार आहे. यंदा चांगल्या हवामानामुळे उच्च प्रकारच्या बेदाण्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाल्याचे दिसून येत आहे. बेदाण्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे  शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सोलापुरातील बेदाणा लिलावातून शेतकºयांचे समाधान होत आहे. बाजार समितीतर्फे लिलावाचा दिवस सोयीचा केला आहे. सांगली-तासगावच्या धर्तीवर दहा रुपयांनी जादा भाव सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांंना मिळत आहे. - पंडित अंबारे, अडत दुकानदार

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार