शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढ्यात मोकाट फिरणार्‍यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 16:13 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील मेडिकल दुकाना समोरील गर्दी वाढत्या कोरोनाला आमंत्रण देत असल्याने सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी भेटीप्रसंगी प्रत्यक्ष पाहिल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा वेळ पडल्यास मेडिकल सील करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवेढयातील वाढता कोरोनाचा आकडा व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरा द्वारे रस्त्यावर मोकाट फिरणार्‍यावर कॅमेरातून नजर ठेवून कारवाई केली जाणार आहे.

सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढयास शुक्रवारी धावती भेट दिली. या दरम्यान शहरात प्रथम आल्यानंतर चोखामेळा चौकात मेडिकलच्या समोर मोठया प्रमाणात गर्दीचे चित्र दिसल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोनाचे नियम पाळा, टेस्टिंग करा, ग्राहकांमध्ये अंतर ठेवा अशा सक्त सुचना करून नियम न पाळल्यास मेडिकल नाईलाजाने सील करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ग्रामीण भागात शेती उद्योगामुळे मजूर, शेतकरी बाहेर पडतात. परिणामी कोरोनाचा संसर्ग  वाढत आहे. शहरात रूग्णांची संख्या कमी असून ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त असल्याचे ते म्हणाले. मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्‍यांची संख्या जादा असल्याने कारवाईसाठी जादा फोर्स देण्यात आला असून अजून नव्याने पाच चारचाकी वाहने देण्याचे नियोजन आहे. मेडिकलवाल्यांची जाग्यावर रॅपीड टेस्ट करण्याच्या सुचना नगरपालिकेस केल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी डीवायएसपी कार्यालयात सांगोला व मंगळवेढा पोलिस अधिकार्‍यांची कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर बैठक घेवून मार्गदर्शनपर सुचना केल्या.

मंगळवेढा तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करूनही काही मोकाट लोक विनाकामाचे रस्त्यावर फिरत असल्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटणार? याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत कारवाईसाठी मंगळवेढयात ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. या ड्रोन कॅमेरामधून कोणाचीही सुटका होणार नाही. रस्त्यावर मोकाट फिरणार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर भाजीपाला विक्रेते गर्दी करीत असल्याने तसेच हॉटेल व ढाबे पार्सल देण्याऐवजी उद्यडे ठेवत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिस प्रशासनाने दिला.

यावेळी डीवायएसपी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक आदि उपस्थित होेते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस