शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:10 IST

सोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र आहे. यात उर्दू भाषा व साहित्य संस्कृतीचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शन भरत आहे याचा अभिमान वाटतो.

ठळक मुद्देसोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शनउर्दु भाषा व साहित्य प्रेमी च्या सहभागातुन शोभा यात्रा उर्दू पुस्तक प्रदर्शनत एकूण ९२ ग्रंथ दालनाची मांडणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : सोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र आहे. यात उर्दू भाषा व साहित्य संस्कृतीचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शन भरत आहे याचा अभिमान वाटतो. या ग्रंथ प्रदर्शनातून सांस्कृतिक उंची नक्की वाढेल, असा विश्वास   महापौर शोभा बनशेट्टी यांनी काढले. केंद्रीय मनुष्यबल विकास मंत्रलयाच्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने, नवी दिल्ली औयोजिलेल्या २१ व्या अखिल भारतीय उर्दू ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार यूनुसभाई शेख होते. बज्मे गालिब सार्वजनिक वाचनालयांच्या संयुक्त सहकार्याने एम ए पानगल एंग्लो उर्दू प्रशालेच्या प्रांगनात  ९ दिवस चालणाºया या उर्दू ग्रंथ प्रदर्शनच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संशोधन अधिकारी शाह नवाज खुर्रम व प्रसिद्धि अधिकारी शम्स शेख यांची उपस्थित होती. या शिवाय बज्मे गालिब संस्थेचे अध्यक्ष बशीर परवाज, डॉ फैज अहमद शेख, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेविका वाहेदा भंडाले, साजिया शेख, नजीर शेख यांची ही उपस्थिति होती. संयोजन समिती चे कार्याध्यक्ष यु एन बेरिया यानी स्वागत तर शम्स शेख यांनी प्रस्ताविक केले. सकाळी उदघाटन सत्रापूर्वी उर्दु भाषा व साहित्य प्रेमी च्या सहभागातुन शोभा यात्रा काढण्यात आली. यात उर्दु विद्यार्थी सहभागी होते. अध्यक्षीय भाषणात युनुसभाई शेख यांनी उर्दू भाषा ही केवळ मुस्लिमाची असल्याचा आभास निर्माण करुण य्या भाषेला टोपी आणि दाडी चिटकवन्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न संकुचित प्रवृतिच्या मंडळीकडून होत असल्याची खंत व्यक्त केली. उर्दु भाषा ही केवल मुस्लिमानचि नसून याच देशात जन्मलेल्या सर्वांची भाषा आहे. स्वतंत्र चळवळीत इन्कलाब जिंदाबाद चा प्रेरणादायी बुलंद नारा याच उर्दू भाषेत दिला होता हे विसरून चालणार नाही असे ही शेख यांनी नमूद केले. प्रारंभी शालेय मुला मुलीनी उर्दू स्वागत गीत सादर केले. सुत्रसंचालन इलियास शेख तर आभार शफी कॅप्टन यांनी मानले. शहरात प्रथमच भरलेल्या उर्दू पुस्तक प्रदर्शनत एकूण ९२ ग्रंथ दालनाची मांडणी झाली असून त्यात विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक ऐतिहसिक कला संशोधन आदि अनेक विषयांचे हजारो उर्दू ग्रंथ उपलब्ध झाले आहे. ३१ पर्यंन्त चालनार्य या उर्दु ग्रंथ प्रदर्शनत नागरिकांची गर्दी होत आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर