शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

सोलापूर : अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती; शेडअभावी बेदाणाधारकात धास्ती

By दिपक दुपारगुडे | Updated: March 19, 2023 12:42 IST

जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत हवामानात मोठा बदल होणार असून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दीपक दुपारगुडे सोलापूर : माढा तालुक्यात हवामानात बदल झाला आहे. राज्याबाहेर अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावून वाहतूक ठप्प केली आहे. बाहेर राज्यांना जोडलेल्या महाराष्ट्रातील महामार्गांवर सध्या ढगाळ वातावरण असल्याने माढ्यातून निर्यात होणारी द्राक्षांचे घड बागेतच लटकले आहेत. खराब होण्यापूर्वीच हरियाणातील व्यापाऱ्यांनी या द्राक्षांकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे तालुक्यातील बागायतदारात पावसाची भीती निर्माण झाली आहे तर त्याही पुढे जाऊन बेदाणा उत्पादक शेतकरी शेडअभावी धास्तावला आहे.

जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत हवामानात मोठा बदल होणार असून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचाच आधार घेत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचे षडयंत्र व्यापाऱ्यांकडून सुरू आहे.

माढा तालुक्यात सध्या उसाचा हंगाम संपला असून ज्वारी, द्राक्ष, हरभरा, गहू, आंबा अशा पिकांच्या काढणीला वेग आला आहे. परंतु लाखो रुपये खर्च करून द्राक्ष बागायतदारांनी जोपासलेल्या बागेला खूप मोठा फटका बसला आहे. 

  • माढा तालुक्यात दीड हजार हेक्टरवर द्राक्षांची लागवड झाली आहे. 
  • दरवर्षी या तालुक्यात कोट्यवधीच्या द्राक्ष हरयाणा, दिल्ली, केरळ, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात प्रामुख्याने निर्यात करतो.
  • बेदाणा सांगली बाजार पेठेत जातो.
  • तालुक्यात दरवर्षी २०० कोटींची उलाढाला होते. यंदा अवकाळीमुळे आर्थिक अडचणीत बागायतदार सापडतोय.
टॅग्स :Solapurसोलापूर