शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराचे बेकायदा बांधकाम ?, चौकशीसाठी सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी फाईल मागविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:05 IST

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बेकायदा बांधकामाकडे लक्ष वेधले होतेअग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर त्यांनी हे निवासस्थान उभारले बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मंगळवारी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बेकायदा बांधकामाकडे लक्ष वेधले होते. अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर त्यांनी हे निवासस्थान उभारले आहे, असा त्यांनी आरोप केला होता.  या बांधकामाविषयी विचारणा केली असता, आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मी बांधकाम विभागाकडून ही फाईल मागविली आहे. फाईलीचा अभ्यास करून यावर बोलणे उचित होईल असे ते म्हणाले. बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. याला कोणी तक्रार करण्याची गरज नाही. बेकायदा बांधकाम निदर्शनाला आल्यावर त्यावर संबंधित विभागाकडून चौकशी करून रितसर कारवाई करणे अपेक्षित आहे असे आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले. माजी आमदार दिलीप माने यांच्या आरोपानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने या बांधकामाविषयी माहिती संकलित करून ठेवली आहे. ही फाईल गुरुवारी आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम घेण्यात आली होती. त्या काळात या ठिकाणी बांधकाम सुरू झाले होते. त्यावेळी पार्किंगक्षेत्रात येणारी वॉचमनची केबीन मनपातर्फे पाडण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम थांबले होते. गुडेवार यांच्या बदलीनंतर वॉचमनच्या केबीनची जागा बदलून हे बांधकाम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती कर्मचाºयांकडून देण्यात आली आहे. -----------------माजी मंत्री ढोबळे यांच्या बांधकामाची चौकशी- माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची जुळे सोलापुरात सिंधुविहार शेजारी म्हाडाच्या जागेत शिक्षण संस्था आहे. या जागेत भव्य वास्तूचे बांधकाम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कार्यालयासाठी बांधकाम परवाना घेण्यात आला व प्रत्यक्षात या जागेवर टोलेजंग इमारतीचे काम सुरू असल्याचे निदर्शनाला आले आहे. बांधकाम परवान्याप्रमाणे या इमारतीचे बांधकाम होत आहे काय, याची तपासणी करण्यात येत असल्याचे बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. आरक्षित जागेवर बांधकाम झाल्याची शहरात अशी आठ प्रकरणे असल्याची माहिती भाजपाच्या एका नगरसेवकाने पुरविली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSubhash Deshmukhसुभाष देशमुख